Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या प्रशांत नेटके या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रशांत नेटके या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
201

जामखेड न्युज——

प्रशांत नेटके या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड येथील केबल नेटवर्कमध्ये काम करणाऱ्या व शहरातील रमेश खाडे नगर (जिजामाता नगर) येथे राहणाऱ्या प्रशांत बाळासाहेब नेटके या ३४ वर्षीय तरूणाने याने रात्रीच्या सुमारास जमादारवाडी शिवारातील आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेमुळे जमादारवाडी व जामखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

जामखेड येथील जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

या घटनेची खबर अशोक दत्तु नेटके यांनी दिली असून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!