जाळ्यात अडकलेल्या पक्ष्याची आमदार रोहित पवारांनी केली सुटका भुतदयेबद्दल आमदार पवारांचे सर्वत्र कौतुक

0
195

जामखेड न्युज——-
जाळ्यात अडकलेल्या पक्ष्याची आमदार रोहित पवारांनी केली सुटका

भुतदयेबद्दल आमदार पवारांचे सर्वत्र कौतुक


आमदार रोहित पवार माणुसकी व भुतदयेबद्दल नेहमीच जागरूक असतात कधी अपघात ग्रस्तांना मदत स्वत: च्या गाडीने दवाखान्यात पोहोचवणे तर कधी जखमी प्राणी पक्षाला वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी मदत करणे हे नेहमीच सुरू असते असाच अनुभव आज आमदार रोहित पवार मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना आला

कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे जात असताना रस्त्याच्या कडेला साळुंकी नावाचा पक्षी जाळ्यात अडकून तडफडत असलेला दिसला ताबडतोब आमदार रोहित पवारांनी आपला ताफा थांबवत जाळ्यात अडकलेल्या साळुंकी पक्ष्याची सुटका केली यामुळे पक्षाला जीवदान मिळाले. तर आमदार साहेबांची भूतदया दिसून आली.

मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना अचानक एक पक्षी जाळ्यात अडकला असल्याचं निदर्शनास आल्यास तात्काळ जाळ्याचे सर्व दोर आमदार रोहित पवार यांनी स्वतः कापून त्या पक्षाची सुटका करून त्याला जीवनदान दिले!

भूतदयेचा एक वेगळा अनुभव या माध्यमातून पाहायला मिळाला, पशूपक्षांबद्दल आमदार रोहित पवार यांचे प्रेम या माध्यमातून पाहायला मिळाले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here