जामखेड न्युज——
ग्रंथ वाचन करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ल. ना. होशिंग विद्यालयात साजरी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त ल. ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथ वाचन करण्यात आले आणि 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी आली.
यावर्षी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर मुलांमध्ये चिं.कार्णिक जगताप,कुमारी वैष्णवी शिंदे कुमारी ऋतुजा पोटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर शिक्षकांमधून श्रीमती प्रा.पोकळे मॅडम,श्री प्रवीण गायकवाड सर व उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ सर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग, सत्याग्रह,संघर्ष,शिक्षण यावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय संघर्षमय अशा जीवनामध्ये प्रचंड वाचन हा त्यांचा जीव की प्राण होता त्यांना माहीत होते शिक्षणाने निर्णय घेता येतो.शिक्षण हाच महत्त्वाचा भाग आहे संपूर्ण जगामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते.अशा या महामानवास आपण आज पासून रोज एक तास वाचन करून अभ्यास करण्याचे ध्येय ठरवले पाहिजे. हिच खरी आदरांजली ठरेल.
जगातील सर्वात मोठ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न, बोधिसत्व, महामानव, विश्वरत्न, ज्ञानाचाअथांग सागर असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करताना वाचन या नव्या संकल्पनेने जयंती साजरी करत आहोत याचा निश्चित आनंद होत आहे असे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी,पालक, विद्यार्थी सर्वांनीच ग्रंथालयातील पुस्तके घेऊन एकत्रित एक तास वाचन केले. सर्वांच्या वाचनानंतर यावेळी काही पुस्तकातील वाचनावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे, शिक्षक प्रतिनिधी रोहित घोडेस्वार, समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे व इंग्रजी विभाग प्रमुख प्रवीण गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पोपट जगदाळे यांनी केले.