Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या पै. अक्षय मदनेने पटकावली मानाची गदा व ठरला श्री साकेश्वर केसरी ...

पै. अक्षय मदनेने पटकावली मानाची गदा व ठरला श्री साकेश्वर केसरी श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान उत्साहात संपन्न

0
257

जामखेड न्युज——

पै. अक्षय मदनेने पटकावली मानाची गदा व ठरला श्री साकेश्वर केसरी

श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान उत्साहात संपन्न

जामखेड तालुक्यातील साकत येथे श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. यात प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. सुहास घोडगे आंतरराष्ट्रीय संकुल, पुणे काका पवार यांचा पट्टा विरूद्ध पै. अक्षय मदने मामासाहेब मोहळ, पुणे पंकज हारतुरे यांचा पट्टा यांच्यात झाली यात अक्षय मदने यांने श्री साकेश्वर केसरी किताब व मानाची गदा पटकावली या कुस्तीसाठी अनिलजी वराट डायरेक्टर धारा गृप आँफ कंपनी इंदोर यांच्या तर्फे एक लाख रुपये ६८ रूपये व श्रीराम घोडेस्वार यांच्या तर्फे मानाची गदा देण्यात आली.

द्वितीय क्रमांक कुस्ती ७१०६८ रूपयांची कुस्ती सौजन्य कै. देवराव दिगंबर वराट गुरूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रा. अरूण वराट व दशरथ तावरे यांच्या तर्फे हनुमंत कोरके विरूद्ध हनुमंत पुरी यांच्यात झाली यात हनुमंत पुरी विजेते ठरले.

 

तृतीय क्रमांक कुस्ती ४१०६८ रूपयांची संजय वराट माजी सभापती व सतिश सरोदे गणेश फर्निचर यांच्या तर्फे पै. बापू जरे शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड विरुद्ध पै. गणेश बेनके पारनेर यांच्यात झाली यात बापू जरे विजेते ठरले.

चतुर्थ क्रमांक कुस्ती ३१०६८ रूपयांची हनुमंत पाटील सरपंच साकत व अजित वराट शंभू ट्रेडर्स साकत यांच्या तर्फे सौरभ गाडे शिऊर विरुद्ध पै. गौतम शिंदे पोथरे यांच्यात झाली यात सौरभ गाडे विजेते ठरले.

पाचव्या क्रमांकाची कुस्ती डॉ. भगवानराव मुरूमकर माजी सभापती व विनोद वराट समाजकल्याण अधिकारी पाटोदा यांच्या तर्फे पै. पृथ्वीराज वनवे विरुद्ध पै. सतिश खरात यांच्यात झाली यात पृथ्वीराज वनवे विजेते ठरले.

तसेच गणेश अडसूळ साकत व अनिस सय्यद आष्टी यांच्यात झालेल्या लढतीत गणेश अडसूळ विजेता ठरला.

अशा एकुण ६८ कुस्त्या झाल्या साकत येथील विना वादनास ६८वर्षे पुर्ण झालेली आहेत म्हणून ६८ हा अंक व कुस्त्याही ठेवल्या होत्या.

हगाम्यासाठी पंच म्हणून बालाजी जरे, श्रीधर मुळे, विठ्ठल देवकाते, सचिन दाताळ, वसंत रसाळ, अजय काशिद, हवा सरनोबत, मोहन पवार, मारूती गाडे, शरद कार्ले, राजू सय्यद, आलेष जगदाळे, मोहन अडसूळ, सुरेश मुरूमकर असतील तर कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर यांनी काम पाहिले.

व्यवस्थापक साकेश्वर कुस्ती समिती, पोलीस पाटील महादेव वराट, वसंत वराट, देविदास वराट
तसेच समस्त ग्रामस्थ साकत यांनी काम पाहिले.

जाहिरात सौजन्य राजस्थान ग्रेनाइट अँड टाईल्स हाऊस शहादेव वराट यांचे होते.

प्रति पंढरपुर म्हणून साकत गावाची परिसरात ख्याती आहे. श्री साकेश्वर महाराज हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. साकतची यात्रा व हगामा हा परिसरातील लोकांसाठी मोठा कुतुहलाचा विषय असतो. देवाला अभिषेक घालण्यासाठी शनीचे राक्षसभुवन येथून गोदावरी नदीचे जल अनवाणी पायांनी कावडीधारक आणतात दोनशे ते अडिचशे लोक आसतात अनवाणी पायांनी चालत जाऊन व चालत आणतात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. लेझीम पथकासह जलाभिषेक केला. नंतर चार वाजता शेरणी वाटप झाली. सायंकाळी नृत्यांगनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील लोकांची मोठी गर्दी केली होती. रात्री बारा वाजता देवाची पालखी संपूर्ण गावात फिरवली. पालखीपुढे देवाचा नंदी दिमाखात चालत होता. गावातील लहान थोर मंडळी देवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

गावात विठ्ठल रूक्मीनी मंदीर असुन या ठिकाणी गेल्या 68 वर्षापासून अखंड विनावादन व नंदादीप तेवत आहे. यामुळे परिसरातील लोक साकतला प्रति पंढरपुर म्हणून ओळखतात.

गावच्या यात्रेसाठी गावातील नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व लोकांनी यात्रेसाठी हजेरी लावली होती.

यावेळी अनिलजी वराट डायरेक्टर धारा गृप आँफ कंपनी इंदोर, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रा. अरूण वराट, सरपंच हनुमंत पाटील, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, राजस्थान ग्रेनाइट अँड टाईल्सचे संचालक शहादेव वराट, सुरेश वराट, केशव तावरे, समाजकल्याण अधिकारी विनोद वराट, माजी कृषी अधिकारी सुंदरदास बिरंगळ, मंगेश (दादा) आजबे, गहिनीनाथ शिरसाठ, अजित वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, श्रीराम घोडेस्वार, नवनाथ बहिर, हरिभाऊ मुरूमकर, प्रमोद मुरूमकर, दादासाहेब वराट, सदाशिव वराट, गणेश वराट, झुंबर पुलवळे, सतिश सरोदे, सुनील वराट, नारायण लहाने, अविन लहाने, विठ्ठल वराट, कांतीलाल वराट, नानासाहेब लहाने, सचिन वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!