Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे २८ व्या वर्षी लाल दिवा मिळाला –...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे २८ व्या वर्षी लाल दिवा मिळाला – रविकांत तुपकर संध्याताई सोनवणे यांचा महापुरुषांची संयुक्त जयंती हा स्तुत्य उपक्रम

0
200

जामखेड न्युज——

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे २८ व्या वर्षी लाल दिवा मिळाला – रविकांत तुपकर

संध्याताई सोनवणे यांचा महापुरुषांची संयुक्त जयंती
हा स्तुत्य उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले या संविधानामुळे मला वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी लाल दिवा मिळाला पण सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी त्याचा त्याग केला संयुक्त जयंती साजरी करण्यामुळे समाजातील जातीभेद नष्ट होत आहे असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितले.


छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंती निमित्त ‘शिंदेशाही बाणा’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे यांनी केले होते यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राणीताई लंके, प्रा. मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव, सलीम बागवान, भाजपातालुकाध्यक्ष अजय काशिद, काकासाहेब तापकीर, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे, नगरसेवक पवन राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, सुनील साळवे, ऋषिकेश मोरे, उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा, संतोष निसर्गगुंदे, नगरसेवक मोहन पवार, विनोद आखाडे, गणेश डोंगरे, संतोष गव्हाळे, युवराज उगले, राहुल उगले सह सर्व पक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

रविकांत तुपकर हे महाराष्ट्रातील राजकारणी व चळवळीचे अग्रणी नेते आहेत. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. सर्व सामान्य,शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.ते आपल्या अभ्यासू, परखड व आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत व युवकांमध्ये त्यांची विशेष क्रेज आहे. विद्यार्थी, तरुण, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आजवर अनेक आंदोलने केली आहेत व त्यासाठी अनेकदा तुरुंगवासही भोगला आहे. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक,कला व क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सहभाग असतो. वामनदादा कर्डक महिले संमेलन बुलढाणा येथे घेतलेले आहे.

 

 

 

महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. संगीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्रातील एक सांगितीक घराणे ज्याला लोकसंगीतचा असाच वारसा लाभला आहे, या घराण्याच्या तब्बल पाच पिढ्या गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्या घराण्याने कव्वाली, पारंपरिक गाणी, भारुड, गोंधळ, प्रेम गीते इत्यादी गाऊन संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली असे ‘शिंदे घराणे’. प्रल्हाद शिंदेपासून सुरु झालेला हा संगीत प्रवास आल्हाद शिंदे म्हणजेच त्यांच्या पणतूपर्यंत सुरु आहे. संगीत क्षेत्रामध्ये अशी घराणी दुर्मिळच असतात ज्यांना पाच पिढ्यांचा वारसा लाभतो. ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमामधून जामखेड करांना संगीताची मेजवानी मिळाली यासाठी बाजारतळावर अलोट गर्दी होती.

संध्याताई सोनवणे या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महिला व विद्यार्थ्यांनीसाठी आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात असंख्य महिला व विद्यार्थ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली तसेच नाथ महोत्सवात नायगाव येथे सुरेखा पुणेकर यांच्या लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

संध्याताई सोनवणे यांचाही वाढदिवस असल्याने त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या 

केशव कोल्हे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!