बाळासाहेबाची शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह गुजरातच्या व्यापाऱ्यांने लुटले – खासदार संजय राऊत

0
120

जामखेड न्युज——

बाळासाहेबाची शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह गुजरातच्या व्यापाऱ्यांने लुटले – खासदार संजय राऊत

शिवसेना पक्ष हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे गुजरातच्या व्यापाऱ्यांने लुटले आहे. आमदार गेले असले तरी जनतेचा जास्त पाठिंबा वाढला आहे. येणाऱ्या निवडणूकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा ७ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाले. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष होते, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरणजी नाईक, शरद पाबळे, संजय मिश्किल, परिषदेचे सरचिटणीस मन्सूर सय्यद, सुभाष गुंदेचा, संदीप कुलकर्णी, मिलिंद आष्टीकर, विजय जोशी, अनिल महाजन, अनिल वाघमारे, शोभाताई जयपूरकर, विठ्ठल लांडगे, नगराध्यक्ष उषा राऊत, कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, निलेश दिवटे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, मिठुलाल नवलाखा, अशोक निमोणकर, लियाकत शेख, सुर्यकांत नेटके, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, सत्ताधारी पक्षाची मुळ ताकद दंगली घडविण्यात आहे. निवडणुका जवळ आल्या की दंगली घडवून आणल्या जातात. तसे पाहता देशाला पाकिस्तान पेक्षा चीनकडून अधिक धोका आहे पण चीन विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत नाही.

खरेच लोकमत आजमावयाचे असेल तर ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकाद्वारे निवडणूका घ्याव्यात मग कळेल लोकमत काय आहे ते २०२४ ला निश्चित परिवर्तन होणार आहे आणी याची सुरुवात महाराष्ट्रापासून होईल. सध्याचे सत्ताधारी राजकारणी व्यापारी आहेत. ते सर्व यंत्रणा विकत घेतात.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सध्याचे सरकार नाही हि तर टोळी आहे आणि जनता या टोळीचा भविष्यात एनकांउटर केल्याशिवाय राहणार नाही सध्या प्रत्येक क्षेत्रात भाजपाने पक्ष आणला आहे. वारकरी संप्रदायातही पक्ष आणला आहे.उद्योगपती देश सोडून पळाले कर्ज बुडाले देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

राज्यकर्ते, हुकूमशहा हे डरपोक असतात खऱ्या पत्रकाराला ते खुप घाबरतात. बातमीत सत्यता हवी
लोक आशेने पाहतील पत्रकारांचे खरे शस्त्र लेखनी आहे याद्वारे भल्याभल्यांना वाकवता येते.
सध्या बोलणारास तुरुंगात टाकले जात आहे. दडपशाही सुरू आहे. वारंवार तुरुंगात जावे लागले तरी मी लिहित राहणारच कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिलेदार म्हणून काम केले आहे त्यांचे गुण आमच्यात आहेत. मी राजकारणी असलो तरी पुर्णवेळ पत्रकार आहे. माझ्या रक्तात पत्रकारिता आहे. तुरूंगात असतानाही लेख लिहिले.

 

यावेळी राज्यातील विविध तालुका व जिल्हा पत्रकार पुरस्कार वितरण करण्यात आले

नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा,
अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती,
लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली,
नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव,
पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे,
कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली,
औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद,
कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here