२२ शेततळे अस्तरीकरणचे बीले निघाले १८० का नामंजूर झाले – राम मुरूमकर

0
158

जामखेड न्युज ——-

२२ शेततळे अस्तरीकरणचे बीले निघाले १८० का नामंजूर झाले – राम मुरूमकर

कृषी खात्याच्या आदेशानुसार २०२१-२२ मध्ये जामखेड तालुक्यात २०२ शेततळे झाले याचे अस्तरीकरण कागदपत्रे, बील आँनलाईन दाखल केले पण फक्त २२ शेततळे अस्तरीकरण बील मिळाले हे कोणत्या निकषांवर मिळाले आणी १८० कोणत्या निकषांवर नाकारले यांची माहिती मिळावी अशी मागणी साकत येथील शेतकरी राम मुरूमकर यांनी निवेदनाद्वारे कृषी विभागाकडे केली आहे.

राम मुरूमकर यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, मी कृषी खात्याच्या आदेशाने शेततळ्याचे काम केले आहे. तरी किती शेतकऱ्यांना कागद टाकायचे आदेश दिले व किती शेतकऱ्यांची बीले दिली कोणत्या निकषांवर हे केले याची माहिती मिळावी.

मी कृषी विभागाच्या आदेशाने कागद आणून अस्तरीकरण केले त्याचे बील, कागदपत्रे, फोटो आँनलाईन दाखल केले पण कृषी विभागाने फक्त २२ शेततळे अस्तरीकरण बील मंजूर केले हे कोणत्या निकषांवर व १८० शेततळे अस्तरीकरण बीले मिळालेले नाहीत हे कोणत्या निकषांवर नाकारले याची सविस्तर माहिती मिळावी.

वारंवार जामखेड कृषी विभागाशी संपर्क केला सतत जाऊन विचारले पण समाधान कारक उत्तर मिळाले नाही. तरी २२ शेततळे अस्तरीकरण बील कोणत्या निकषांवर दिले व १८० कोणत्या निकषांवर नाकारले याची माहिती मिळावी अशी मागणी राम मुरूमकर यांनी केली आहे. तसेच आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे व जिल्हा कृषी अधिकारी यांनाही निवेदनाची प्रत दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here