जामखेड न्युज——
रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उत्कृष्ट निकाल
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या हिवाळी परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर चा बीएचएमएस प्रथम वर्षाचा नियमीत बॅचचा निकाल सत्तर टक्के तर नियमित बॅचचा द्वितीय वर्षाचा शंभर टक्के लागला आहे अशी माहिती प्र.प्राचार्य डॉ.संदीप सांगळे यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
बीएचएमएस प्रथम वर्षामध्ये अनुक्रमे कु.सुचिता गोरक्षनाथ आढाव -प्रथम,कु.देविका सुतार द्वितीय व कु.नेत्रा सुलाखे तृतीय क्रमांकाने याउत्तीर्ण झाल्या आहेत.बीएचएमएसच्या द्वितीय वर्षामध्ये अनुक्रमे कु.वैष्णवी घुले-प्रथम,कु.दिपाली बोरसे-द्वितीय व कु.पल्लवी गलधर-तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांच्यासह प्रा.डॉ.सर्फराज खान,प्रा.डॉ.झेबिया शेख,डॉ.संदीप सांगळे,डॉ.दिपाली सांगळे, डॉ.मनिषा बांगर, डॉ.श्रध्दा मुळे, डॉ.गफ्फार शेख,डॉ.सोनाली यादव,डॉ बाबासाहेब यादव, डॉ.कमल यादव, डॉ. संजय झिने,डॉ. सौ.वैशाली झिने,सौ.प्रज्ञा पुजारी,सौ.आयुषा खेडकर,सौ.वर्षा ढेरे, कु.पुजा खडताळे आदींचे मार्गदर्शन लाभले.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात नर्सिंग,फार्मसी व होमिओपॅथिक अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असुन चालु शैक्षणिक वर्ष 2022-23 पासुन संस्थेच्या रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजला शंभर विद्यार्थी क्षमतेसह मंजुरी मिळाली आहे अशी माहिती संस्थेच्या सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी 2022 च्या परीक्षेत प्रथम वर्ष बीएचएमएस चा रत्नदीप होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या महाविद्यालयाचा आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे सत्तर टक्के निकाल लागला आहे.त्याबददल संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी सर्व स्टाफचे व विद्यार्थी-विद्यार्थीनींचे अभिनंदन केले आहे.
चौकट:- रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच परीक्षेची उत्तम तयारी करून घेतली जाते. तसेच कोशल्याधारीत व नावीन्यपूर्ण उपक्रमांचे नियमितपणे व सातत्याने आयोजन करण्यात येते त्याचा विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासासाठी चांगला फायदा होत आहे.
कु.सुप्रिया शेवाळकर
विद्यार्थीनी प्रतिनिधी
रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर
तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर