श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त मंगळवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

0
150

जामखेड न्युज——

श्री साकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त मंगळवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

तालुक्यातील साकत येथे सोमवारी दि. १० रोजी यात्रा तर मंगळवारी ११ एप्रिल रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. यात प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. सुहास घोडगे आंतरराष्ट्रीय संकुल, पुणे काका पवार यांचा पट्टा विरूद्ध पै. विकास सुळ मामासाहेब मोहळ, पुणे पंकज हारतुरे यांचा पट्टा यांच्यात होईल या कुस्तीसाठी अनिलजी वराट यांच्या एक लाख रुपये ६८ रूपये व मानाची गदा देण्यात येईल तसेच अनिलजी वराट डायरेक्टर धारा गृप आँफ कंपनी इंदोर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. श्रीराम घोडेस्वार यांच्या तर्फे मानाची गदा देण्यात येणार आहे.

द्वितीय क्रमांक कुस्ती ७१०६८ रूपयांची कुस्ती सौजन्य कै. देवराव दिगंबर वराट गुरूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रा. अरूण वराट व दशरथ तावरे यांच्या तर्फे हनुमंत कोरके विरूद्ध हनुमंत पुरी यांच्यात होईल

तृतीय क्रमांक कुस्ती ४१०६८ रूपयांची संजय वराट माजी सभापती व सतिश सरोदे गणेश फर्निचर यांच्या तर्फे पै. बापू जरे शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड विरुद्ध पै. गणेश बेनके पारनेर यांच्यात होईल

चतुर्थ क्रमांक कुस्ती ३१०६८ रूपयांची हनुमंत पाटील सरपंच साकत व अजित वराट शंभू ट्रेडर्स साकत यांच्या तर्फे सौरभ गाडे शिऊर विरुद्ध पै. गौतम शिंदे पोथरे यांच्यात होईल.

पाचव्या क्रमांकाची कुस्ती डॉ. भगवानराव मुरूमकर माजी सभापती व विनोद वराट समाजकल्याण अधिकारी पाटोदा यांच्या तर्फे पै. पृथ्वीराज वनवे विरुद्ध पै. सतिश खरात यांच्यात होईल अशा एकुण ६८ कुस्त्या होतील साकत येथील विना वादनास ६८वर्षे पुर्ण झालेली आहेत म्हणून ६८ हा अंक आहे.

हगाम्यासाठी पंच म्हणून बालाजी जरे, श्रीधर मुळे, विठ्ठल देवकाते, सचिन दाताळ, वसंत रसाळ, अजय काशिद, हवा सरनोबत, मोहन पवार, मारूती गाडे, शरद कार्ले, राजू सय्यद, आलेष जगदाळे, मोहन अडसूळ, सुरेश मुरूमकर असतील तर कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर असतील

नवीन कुस्त्या जोडल्या जाणार नाहीत, पंचाचा निर्णय अंतिम राहिल स्थळ जिल्हा परिषद शाळा साकत असेल व्यवस्थापक साकेश्वर कुस्ती समिती, पोलीस पाटील महादेव वराट तसेच समस्त ग्रामस्थ साकत असतील जाहिरात सौजन्य राजस्थान ग्रेनाइट अँड टाईल्स हाऊस शहादेव वराट यांचे असेल

प्रति पंढरपुर म्हणून साकत गावाची परिसरात ख्याती आहे. श्री साकेश्वर महाराज हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. साकतची यात्रा व हगामा हा परिसरातील लोकांसाठी मोठा कुतुहलाचा विषय असतो. देवाला अभिषेक घालण्यासाठी शनीचे राक्षसभुवन येथून गोदावरी नदीचे जल अनवाणी पायांनी कावडीधारक आणतात दोनशे ते अडिचशे लोक आसतात अनवाणी पायांनी चालत जाऊन व चालत आणतात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. लेझीम पथकासह जलाभिषेक केला जातो. नंतर चार वाजता शेरणी वाटप होते. सायंकाळी नृत्यांगनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील लोकांची मोठी गर्दी असते. रात्री बारा वाजता देवाची पालखी संपूर्ण गावात फिरवली जाते. पालखीपुढे देवाचा नंदी दिमाखात चालत असतो. गावातील लहान थोर मंडळी देवाचे दर्शन घेतात. दुसर्‍या दिवशी हगामा असतो यासाठी परिसरातील नावाजलेले मल्ल हजेरी लावत आसतात. शेवटची कुस्ती ही साकेश्वर केसरी साठी होते ही कुस्ती विजेत्यास परिसरात मानाचे स्थान असते. गावात विठ्ठल रूक्मीनी मंदीर असुन या ठिकाणी गेल्या 68 वर्षापासून अखंड विनावादन व नंदादीप तेवत आहे. यामुळे परिसरातील लोक साकतला प्रति पंढरपुर म्हणून ओळखतात.

गावच्या यात्रेसाठी गावातील नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व लोक यात्रेसाठी येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here