जामखेड न्युज——
शहरातील घरांवरून व प्लाँटवरून गेलेली ३३ केव्हीची महावितरणची लाईन शिफ्ट करावी – रमेश (दादा) आजबे
शहर व वाडी वस्तीवरील अडीअडचणी विषयी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करत सोडवले अनेक प्रश्न
३३ केव्हीच्या महावितरणच्या लाईनमुळे शहरातील दोनशे घरांना व तिनशे मोकळ्या प्लाँटधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. दुसऱ्या मजल्याचे काम करता येत नाही त्यामुळे ही लाईन शिफ्ट करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा ) आजबे यांनी आमदार रोहित पवार यांच्या कडे केली आहे. यास सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर लाईन शिफ्ट करण्यात येईल असे आश्वासन दिले. यामुळे ज्यांच्या घरांवरून लाईन गेलेली आहे. अशा सुमारे पाचशे लोकांना रमेश (दादा) आजबे मुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत रमेश (दादा) आजबे यांनी शहरासह वाडी वस्तीवरील रस्ते, वीज, पाणी याच बरोबर गटारे अशी अनेक प्रश्न मार्गी लावली आहेत. कोट्यवधी रुपयांची पदरमोड करत अनेक अडचणी सोडविल्या आहेत. स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी स्वच्छता अभियान ही लोकचळवळ बनवली होती तसेच घरोघरी कचरा कुंडीचे वाटप केले होते याचबरोबर हरित जामखेड साठी शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून उन्हाळ्यात टँकरने पाणी घातले, संरक्षण जाळी बसवली यामुळे झाडे डेरेदार झालेली आहेत.
शहरातील व वाडी वस्तूवरील अडीअडचणी विषय संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करत आतापर्यंत अनेक अडीअडचणी सोडविल्या आहेत.
आमदार रोहित दादा पवार यांना आष्टी वरून जामखेड MSEB ला आलेली 33 केव्ही मेन लाईन ही 200 लोकांच्या घरावरून तसेच 300 मोकळ्या प्लॉट वरून व बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटिंगला असलेल्या जमिनीवरून आलेली आहे या लाईनमुळे घराचा दुसरा मजला बांधता येत नाही कुठलंही त्या लाईन चा खाली शेड करता येत नाही किंवा त्या भागातील सर्व नागरिकांचे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर या 33 केव्ही मेन लाईन मुळे अडचण निर्मान होत आहे त्याकरता ही लाईन आता सुरू असलेल्या नगर जामखेड हायवेच्या कामाच्या कडेने घेतल्यास खूप मोठी शेतकऱ्यांची अडचण दूर होईल याकरिता रोहित दादा ना पत्र दिले व दादांनी सकारात्मक भूमिका दाखवल्याबद्दल दादांचे मनापासुन धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहेत.