साकतमध्ये आज रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे किर्तन

0
163

जामखेड न्युज——
साकतमध्ये आज रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे किर्तन

हसवत हसवत रडवणारे व एक एक वाक्य काळजाला भिडणारे असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे किर्तन सायंकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यातील साकतची ओळख प्रतिपंढरपूर म्हणून आहे. येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त, आखील भारतीय वारकरी मंडळ प्रेरित आज गुरूवार दि. १६ एप्रिल पासून भव्य- दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात सुरूवात झाली आहे.

यावेळी हभप माऊली महाराज कोल्हे, हभप भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, दिनकर महाराज मुरूमकर, ज्ञानदेव मुरूमकर, अतुल दळवी, अश्रू सरोदे, रामभाऊ मुरूमकर यांच्या सह सप्ताहासाठी गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, माऊली महाराज कोल्हे, हभप माऊली महाराज गाडे, हभप दादा महाराज सातपुते, हभप काका महाराज निगुडे, हभप पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, हभप गहिनीनाथ सकुंडे, हभप अशोक महाराज सपकाळ, विठ्ठल भजनी मंडळ, श्री साकेश्वर भजनी मंडळ, हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या फडावरील भजनी मंडळ यांच्या मुळे परिसरात भक्ती मय वातावरण निर्माण झाले आहे. आज रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे किर्तन होणार आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम

 

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप माऊली महाराज कोल्हे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ९ ते ११ हरिकिर्तन, ११ ते ४ हरिजागर असा दिनक्रम असेल.

पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा झाली

गुरूवार दि १६ एप्रिल रोजी कर्जत येथील विनोदाचार्य हभप आक्रुर महाराज साखरे

शुक्रवार दि. १७ रोजी डिकसळ येथील हभप आण्णासाहेब महाराज बोधले,

शनिवार दि. १८ रोजी कर्जत येथील हभप प्रकाश महाराज जंजिरे

रविवार दि. १९ रोजी भूम येथील हभप अतिश महाराज कदम

सोमवार दि. २० रोजी पंढरपूर येथील ज्ञानसिंधू हभप जयवंत महाराज बोधले
वरील मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने झाली.

रात्री मंगळवार दि. २१ रोजी बीड येथील हभप महादेव महाराज राऊत यांचे किर्तन झाले.

आज बुधवार दि. २२ रोजी नागपूर येथील प्रसिद्ध रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे किर्तन होणार आहे. आपल्या वाणीने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा दबदबा निर्माण केलेला आहे.
हसवत हसवत रडवणारे व एक एक वाक्य काळजाला भिडणारे अशी शब्द फेक असते. यामुळे कीर्तनामध्ये प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही असे प्रसिद्ध किर्तनकाराचे किर्तन होत आहे. तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध
तसेच गुरूवार दि. २३ रोजी सकाळी ९ ते ११ हभप प्रकाश महाराज बोधले डिकसळ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here