जामखेड तालुका जुनी पेन्शन योजना कर्मचारी कृती समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान आम्ही तुम्हाला रक्त देतो तुम्ही आम्हाला पेन्शन द्या
जामखेड न्युज—— जामखेड तालुका जुनी पेन्शन योजना कर्मचारी कृती समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान
आम्ही तुम्हाला रक्त देतो तुम्ही आम्हाला पेन्शन द्या
मराठी नववर्षानिमित्त जामखेड तालुका जुनी पेन्शन योजना कर्मचारी कृती समिती व आनंदऋषी ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने जामखेड पंचायत समितीच्या सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात एकुण ८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. व शासनास विनंती केली की
“आम्ही तुम्हाला रक्त देतोत तुम्ही आम्हाला पेन्शन द्या.”
अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या
कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील,वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशांक वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, कृषी अधिकारी अशोक शेळके, सुनील मिसाळ, मुख्याध्यापक संघाचे दशरथ कोपनर, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण गायकवाड, जामखेड मिडिया क्लबचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, ज्योती पवार मॅडम शोभा कांबळे, शिवाजी हजारे (तलाठी), नगर जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विश्वस्त मुकुंदराज सातपुते, शिक्षक नेते राम निकमबँकेच्या माजी संचालक सीमा क्षीरसागर, मीना राळेभात, ग्रामसेवक अनिल आटोळे, बबन बहिर, सुरेश मोहिते, केशव कोल्हे, राम ढवळे, नवनाथ बहिर, मनोज दळवी, पाराजी टेमकर, पांडुरंग मोहळकर आदी सह रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबीरामध्ये ८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच या शिबीरामध्ये माहिलांनीही रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी जामखेड तालुका कृती समिती चे अध्यक्ष युवराज पाटील, सचिव ज्ञानेश्वरकोळेकर, प्रवीण शिंदे, अमोल पवार, रामहरी बांगर, विजयराज जाधव, अविनाश नवसरे, केशव कोल्हे व कृती समितिचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
या रक्तदान शिबीरासाठी विशेष सहकार्य सुनिल महानोर, डाँ. शंकर मोरे, विशाल जाधव,समिर बेगयांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी तर आभार बापूराव माने यांनी मानले.