खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे चार रस्त्यांच्या कामासाठी वीस कोटी १९ लाखांचा निधी मंजूर

0
173

जामखेड न्युज——

खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे चार रस्त्यांच्या कामासाठी वीस कोटी १९ लाखांचा निधी मंजूर

 

आमदार प्रा.राम शिंदे व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आशियाई विकास बँक यांच्या अर्थसहाय्य अंतर्गत कर्जत-जामखेड मतदार संघातील चार महत्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी २०१९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आली आहे.

जामखेड तालुक्यातील नान्नज ते घोडेगाव या सुमारे साडे सहा किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५६९.२० लक्ष रुपये, जवळा बोर्ले ते करमाळा या सुमारे साडे तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी ३२८.३५ लक्ष रुपये, तसेच कर्जत तालुक्यातील जलालपूर ते ताजू या सुमारे साडे पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५८७.३८ लक्ष रुपये, तर नांदगाव ते राक्षसवाडी या साडे पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५३४.०७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच या कामांना सुरवात होणार आहे.

कर्जत- जामखेड या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विशेषतः शेतकऱ्यांसाठी दळणवळणाच्या नाड्या असलेल्या या रस्त्यांची कामे व्हावीत अशी अनेक दिवसांपासून लोकांची मागणी होती. जनतेच्या याच मागणीचा विचार करून आमदार प्रा.राम शिंदे व खासदार डॉ.सुजय विखे पाटील या दोन्ही नेत्यांनी या प्रश्नी सरकार दरबारी पाठपुरावा करून या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळवून घेतल्याने या कर्जत-जामखेड तालुक्यातील चार महत्वाच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नान्नज, जवळा, जलालपूर, ताजू , नांदगाव व राक्षसवाडीच्या ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

 

चौकट

हे माझे कर्तव्यच

कर्जत-जामखेड हा माझा मतदार संघ आहे. येथील जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते शासनाच्या माध्यमातून तयार करून देणे हे माझे कर्तव्यच आहे. मी लोकांना दिलेला शब्द पाळणारा जबाबदार नेता आहे. मला दिशाभूल करता येत नाही असे यावेळी आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here