जामखेड न्युज——
ल. ना. होशिंग विद्यालयात मराठी राजभाषा दिवस उत्साहात संपन्न
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण मराठी साहित्याचा मानदंड अर्थात विष्णू वामनशिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये राजभाषा दिन सकाळच्या सुंदर अशा वातावरणामध्ये सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा ठेवा पुढील पिढीला माहिती होण्याकरिता प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या संकल्पनेतील अतिशय सुंदर असा सांस्कृतिक वारसा जपणारा संस्कृती कार्यक्रम संपन्न झाला. सर्व प्रकारची लोकगीते, संत साहित्य, देवीची गीते, भारूड, गौळण, वासुदेव, शेतकरी गीत, पोवाडा इ.
पारंपरिक लोकगीते व पोषाख परिधान करून गावामधून भव्य ग्रंथदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमासाठी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष उद्धवरावजी देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे, उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभाग प्रमुख अनिल देडे, किशोर कुलकर्णी, साईप्रसाद भोसले, सदाफुले, श्रीमती संगीता दराडे,श्रीमती सुप्रिया घायतडक,श्रीमती पूजा भालेराव,श्रीमती रेश्मा कारंडे यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख अनिल देडे यांनी केले व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे,यांनी केले