जामखेड न्युज——
गोकुळ गायकवाड यांचा धम्म परिषदेत सन्मान
२६फेब्रुवारी २०२३ रोजी १२५ व्या त्यागमूर्ती रमाई जयंती निमित्त आयोजित भूम जिल्हा उस्मानाबाद येथे पहिल्या राज्यस्तरीय धम्म परिषदेत बौद्धाचार्य , आदर्श शिक्षक, लेखक धम्म प्रवचनकार धम्मगिरी बुद्ध विहाराचे निर्माते, आयु.गोकुळ गायकवाड यांच्या ३५वर्षांचे उत्कृष्ट व प्रेरणादायी धम्म कार्याबाबत, गाव तेथे बुध्द विहार निर्माण कार्य, ७ समाज मंदिराचे बुध्द विहारात रूपांतर तसेच धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा हा संत तुकाराम महाराज यांच्या गाथेमधील निवडक ओव्या आणि संत कबीर यांच्या दोह्याशी तंतोतंत जुळणाऱ्या धम्मपद यांच्या जोड्या यांचे लेखन केलेला ग्रंथ इत्यादी कार्याची दखल घेऊन मा. ई .झैड . खोब्रागडे साहेब सेवानिवृत्त IAS अध्यक्ष संविधान फौंडेशन नागपूर यांचे हस्ते शाल, बुके आणि सन्मान चिन्ह , देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मा . शिरिष बनसोडे साहेब अतिरिक्त सी.ओ.जालना,मा.प्रदिप पौळ साहेब उपायुक्त आदिवासी विकास मंडळ नासिक, मा.चंद्रकांत शिंदे साहेब तहसीलदार तुळजापूर जेष्ठ बौद्धाचार्य बाबुजी सुकाळे सर, मेघराज गायकवाड, विनायक म्हस्के सर,वसंत वाघमारे साहेब, प्रदिप चंदनशिवे साहेब,अनिल सदाफुले साहेब, सुरेखा सदाफुले, मिनाक्षी गायकवाड, अक्षयकुमार गायकवाड,शुभम साळवे,निलावती गायकवाड ,यश गायकवाड सह अनेक बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या सन्मानाबद्दल गोकुळ गायकवाड यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.