जामखेड न्युज——
साकत गाव म्हणजे शिक्षकांचा कारखाना- संजय वराट
श्री साकेश्वर विद्यालयात सदिच्छा निरोप व वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न
साकत गावाला सुरूवातीपासूनच शिक्षणाचे महत्त्व कळलेले आहे. त्यामुळे शाळेच्या विकासात कोणीही राजकारण करत नाही राजकीय जोडे बाहेर काढूनच सर्व पक्षीय नेते मंडळी शाळेच्या विकासासाठी एकत्र झटतात त्यामुळे साकत गाव म्हणजे शिक्षकांचा कारखाना झालेला आहे. असे मत पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट यांनी व्यक्त केले.
श्री साकेश्वर विद्यालयात इयत्ता दहावीचा सदिच्छा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती, प्राचार्य श्रीकांत होशिंग,
डॉ. भगवान मुरूमकर, माजी चेअरमन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक प्रा. अरूण वराट, चेअरमन कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरूमकर, व्हाइस चेअरमन दादासाहेब नेमाने, प्राचार्य दादासाहेब मोहिते, बाळासाहेब वराट, पोलीस पाटील महादेव वराट, संतोष देशमुख, अभिषेक पाटील, सचिन मुरूमकर, कांचन निकाळजे, शिवचंद वराट, रामचंद्र वराट गुरूजी, प्रभु वराट गुरूजी, गोपाळ नेमाने, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर,आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
इयत्ता दहावीत 2020,21,22 मध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेल्या गुणवंत विदयार्थी, गणित विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केलेले विद्यार्थी, शिक्षक, चित्रकला स्पर्धेत, मैदानी क्रीडा प्रकारात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी मिटींग टेबल भेट दिला, तसेच हराळे भाऊसाहेब यांनी शाळेसाठी दोन कपाट व खुर्ची भेट दिली.
यावेळी राधिका वराट, दिपाली वराट, या इयत्ता दहावीत विद्यार्थींनीनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर चेअरमन कैलास वराट, प्राचार्य दादासाहेब मोहिते, सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उद्धव (बापू) देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, शशिकांत देशमुख
यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी बोलताना संजय वराट म्हणाले की, गावातील लोकांचा शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे आज प्रत्येक विषयाचा उच्चशिक्षित गावात आहे. साकत गाव म्हणजे शिक्षकांचा कारखाना आहे असे परिसरातील लोक नेहमीच म्हणतात असे संजय वराट यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट, अर्जुन रासकर यांनी तर आभार अशोक घोलप यांनी मानले.