शाळेतील दिवस आयुष्याची दिशा ठरवतात पत्रकार भूषण देशमुख ल. ना. होशिंग विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

0
237

जामखेड न्युज——

शाळेतील दिवस आयुष्याची दिशा ठरवतात पत्रकार श्री भूषण देशमुख

ल. ना. होशिंग विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड जिल्हा अहमदनगर मध्ये 2022- 23 बक्षीस वितरण समारंभ अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला.

गर्जा महाराष्ट्र माझा राज्यगीताने अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी विद्यार्थी आदर्श पत्रकार श्री भूषणजी गोपाळ देशमुख साहेब यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री उद्धवरावजी देशमुख साहेब दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी,उपाध्यक्ष श्री अरुण शेठजी चिंतामणी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी,सचिव श्री शशिकांत देशमुख,सहसचिव श्री दिलीपजी गुगळे, खजिनदार श्री राजेशजी मोरे, संचालक श्री अशोक शेठ शिंगवी, संचालक श्री सैफुल्ला खान साहेब, त्याचबरोबर श्री डॉ. काशीद साहेब,श्री रमेश शेठजी गुगळे,श्री प्रवीण देशपांडे सर्व मान्यवर तसेच उपप्राचार्य श्री पोपट जरे, उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ,पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे व सर्व प्राध्यापक, अध्यापक व शिक्षकेतर बंधु- भगिनी आणि विद्यार्थी वृंद उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग साहेब यांनी 2021-22 मधील इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थी त्यांनी प्राप्त केलेले यश याबद्दल निकालासहित सविस्तर माहिती दिली.

त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री भूषणजी देशमुख शाळेचे माझी विद्यार्थी,अनेक वर्तमानपत्रांमध्ये पत्रकारिता म्हणून काम केले. त्याचबरोबर आकाशवाणी, एफएम,अनेक पुस्तकांचे लेखक लेखन महत्त्वाचा भाग,स्नेहलयासाठी मनापासून केलेले काम. इतिहासासाठी दिलेले योगदान अशाअष्टपैलू व्यक्तिमत्व पत्रकार श्री भूषणजी देशमुख यांचा परिचय करून दिला.

सर्व ज्युनिअर कॉलेज स्टाफ विद्यार्थ्यांसाठी घेत असलेले कष्ट व नवीनच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे.याबद्दल सर्व प्राध्यापकांचे मनोमन कौतुक केले.

त्याचबरोबर माध्यमिक विभागांमध्ये ही वेगवेगळे विविध उपक्रम,वेगवेगळे जयंती दिन,मराठी,गणित, विज्ञान,इतिहास भूगोल,सर्व विषय दिन अतिशय मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.त्याचबरोबर एन एम एम एस यात विद्यार्थी यशस्वी होऊन त्यांना मिळालेली 48000 हजार स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळाली ही शाळेसाठी आनंदाची बाब आहे.त्याचबरोबर एनसीसी विभाग अनेक विद्यार्थी ए ग्रेड मध्ये आले आहेत,क्रीडा विभाग अनेक विद्यार्थी नॅशनल पर्यंत पोहोचले आहेत,चित्रकला विभाग यातही इलेमेंटरी, इंटरमिजिएट 100% निकाल व अनेक विद्यार्थी ए ग्रेड मध्ये उत्तीर्ण आहेत,कॉम्प्युटर विभाग शाळेसाठी अतिशय जिव्हाळ्याचा संबंध अतिशय उत्कृष्ट काम आहे,ग्रंथालय,प्रयोगशाळा विभाग सर्वच विभागांमध्ये नावीन्यपूर्ण स्पर्धा व उपक्रम घेतले जातात.त्याबद्दल माध्यमिक शिक्षकांचेही प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग साहेब यांनी अभिनंदन केले.
शाळेच्या संस्थेच्या विकासासाठी सर्व संचालक मंडळ यांची अतिशय मदत होते त्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला. अनेक शिक्षक शैक्षणिक कार्याबरोबर संघटनात्मक कार्यामध्ये ही आहेत याबद्दल निश्चित शाळेला अभिमान आहे.

अमृत महोत्सवी वर्ष यावर आधारित ज्ञानदीप अंक हस्तलिखित याचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले.यामध्ये 75 देशभक्त यांची माहिती हस्तलिखित करण्यात आली आहे.नववी अ च्या वर्ग शिक्षिका श्रीमती प्रभा रासकर व सर्व दरवर्षी पुरस्कृत करणारे आदरणीय डॉक्टर श्री गायकवाड पी बी सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर गुणवंत विद्यार्थी यांचे सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. त्याचबरोबर कलाशिक्षक श्री राऊत मुकुंद घनशाम 2021 – 22 साठी गुणवंत शिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी पत्रकार श्री भूषणजी देशमुख साहेब यांनी आपल्या मनोगता मध्ये शाळेतील सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील दिवस जीवनातील आपली दिशा ठरवतात. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून शिस्तीचं पालन केलं पाहिजे.असेच विद्यार्थी निश्चितच पुढे जातात.शाळेचं,गावाचं नाव उंच करतात यात शंका नाही.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेतच अनेक नाविन्यपूर्ण कौशल्यपूर्ण बिजांचं रोपण होत असतं,त्याचबरोबर शाळेत व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे त्यामुळे आपण सर्वजण विद्यार्थी अतिशय भाग्यवान आहात.
उंच इमारती उभ्या करण्यापेक्षा विद्यार्थी कर्तृत्वाने उंच व्हावेत हा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मिळणारी कौतुकाची थाप आयुष्यभर पुढे जाण्यासाठी आनंद देणारी असते,विद्यार्थी घडवण्यामध्ये आई वडील, शिक्षक या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विशेष म्हणजे कै.शांताबाई लक्ष्मणराव देशमुख स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा, कै.सुरेश दिगंबरराव मोरे स्मृती प्रित्यर्थ निबंध स्पर्धा, एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चित्रकला स्पर्धा, या सर्व स्पर्धा गेल्या वीस वर्षापासून अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहेत.त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे विद्यार्थी व एनसीसी मधील यशस्वी विद्यार्थी यांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समारंभ प्रमुख श्री नरेंद्र डहाळे, प्राध्यापक श्री शेख, श्री अनिल कुमार देडे,श्री राऊत मुकुंद,श्री विशाल पोले सर, श्री अनिल देडे सर,श्री आदित्य देशमुख,श्री सुरज गांधी,श्री हनुमंत वराट,श्री निलेश भोसले,श्री विजय शिरसागर,श्री साई भोसले, शिक्षक प्रतिनिधी श्री रोहित कुमार घोडेस्वार सर्वच शिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासाठी श्री प्रवीण गायकवाडसर,श्री अनिल देडेसर ,श्रीमती प्रा.जयश्री सरडे मॅडम,श्रीमती प्रा.योगिता भोसले मॅडम,श्रीमती सुप्रिया घायतडक मॅडम.यांनी केले व त्याचबरोबर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here