जामखेड न्युज——
महावितरणचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रक्टर दत्तात्रय वारे यांना पितृशोकशामराव वारे यांचे अल्पशा आजाराने निधन
महावितरणचे गव्हरमेंन्ट कॉन्ट्रक्टर दत्तात्रय वारे यांचे वडील शामराव रामराव वारे, चेअरमन (वय- ६९ वर्ष) यांचे दिनांक २३फेब्रुवारी रोजी सकाळी ६:०० वाजता अ नगर येथे हॉस्पीटल मधे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनाची बातमी कळताच जामखेड व रत्नापुर परिसरात शोककळा पसरली.
रत्नापुर गावात त्यांच्या घराशेजारील शेतात शोकांकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा गावच्या राजकारणात खूप मोठा ठसा होता, त्यांच्या शब्दाला खूप मोठा मान होता व ते नेहमीच किंगमकेरच्या भूमिकेत राहत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली सुना नातवंडे, नातुरुंड असा खूप मोठा परिवार आहे.
त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने संपूर्ण परीवारावर व गावावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.