राज्यातील प्रथमच अंगणवाडी बालकांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न खालील स्पर्धक चिमुकल्यांनी पटकावले क्रमांक

0
223

जामखेड न्युज——

राज्यातील प्रथमच अंगणवाडी बालकांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

खालील स्पर्धक चिमुकल्यांनी पटकावले क्रमांक

जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जामखेड अंतर्गत अंगणवाडीतील बालकांसाठी तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी ल.ना. होशिंग विद्यालय येथे करण्यात आले होते. यामध्ये अंगणवाडीतील सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांसाठी वक्तृत्व स्पर्धा, कथा सादरीकरण, वेशभूषेनुसार सादरीकरण, वैयक्तिक गीत गायन, समूहगीत गायन, नृत्य व नाट्य इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.


राज्यात प्रथमतःच अंगणवाडीतील बालकांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः अंगणवाडी सेविका यांनी अंगणवाडी स्तरावर कार्यक्रमांची तयारी घेतल्यानंतर प्रत्येक बीटमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व प्रत्येक बीट मधून प्रथम क्रमांकाचे स्पर्धक यांच्या तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. तालुक्यात राबवण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमास तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. अंगणवाडीतील या चिमुकल्या बालकांनी अतिशय सुंदर असे सादरीकरण करून सर्व उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ , बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेल्हेकर, तालुका आरोग्य अधिकारी श्री. सुनील बोराडे, गटशिक्षण अधिकारी श्री. कैलास खैरे, पर्यवेक्षिका श्रीम. सानप , श्रीम.कांबळे, श्रीम. आंधळे, श्रीम. आढाव तसेच तालुक्यातील सर्व सेविका, मदतनीस व पालक उपस्थित होते.

पार पडलेल्या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- सार्थक रामहरी आवारे ( माळेवाडी),

द्वितीय क्रमांक- मिदहत इस्माईल शेख (भीमनगर नान्नज) तर

तृतीय क्रमांक- प्रणाली पोपट जगदाळे (वाघा )यांनी पटकावला.

कथा सादरीकरण मध्ये प्रथम क्रमांक सानिका सुनील काळे (भोंडवे वस्ती घोडेगाव) द्वितीय क्रमांक-प्रगती गणेश अनभुले (लटके वस्ती शिऊर) तृतीय क्रमांक- मनस्वी नारायण सानप (कारंडे वस्ती आरणगाव)

वेशभूषा नुसार सादरीकरण प्रथम क्रमांक- श्रीनिधी मयूर भोसले (शिवाजीनगर)
द्वितीय क्रमांक- शौर्य शहाजी पांडुळे (धोंडपारगाव)
तृतीय क्रमांक- श्लोक अरुण सस्तारे ( खांडवी)

वैयक्तिक गीत गायन प्रथम क्रमांक- हर्ष पोपट कोरडे ( गुरेवाडी )
द्वितीय क्रमांक- विहान नवनाथ कडू( लटके वस्ती शिऊर)
तृतीय क्रमांक- तमन्ना जमीर शेख ( आघी)

समूहगीत गायन प्रथम क्रमांक- माळवाडी झिक्री अंगणवाडी
द्वितीय क्रमांक- श्रीराम नगर अंगणवाडी

तृतीय क्रमांक- मोहा अंगणवाडी

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक -शा.मू. वस्तीगृह अंगणवाडी द्वितीय क्रमांक- झिक्री अंगणवाडी तृतीय क्रमांक- लटके वस्ती अंगणवाडी यांनी पटकावला. सर्व विजेते स्पर्धकांना तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र ट्रॉफी व शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी जामखेड यांनी सर्व बालकांसाठी स्वखर्चाने खाऊ दिला. दत्तवाडी शाळेचे शिक्षक श्री. इनामदार सर यांनी प्रथम क्रमांकाच्या सहा ट्रॉफी उपलब्ध करून दिल्या. पत्रकार अशोक वीर यांनी संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग व फोटो मोफत करून दिले. परीक्षक म्हणून श्री संतोष सरसमकर व श्री अविनाश बोधले यांनी कामकाज पाहिले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कांबळे सर व श्रीम.दळवी मॅडम यांनी केले.

 

चौकट

वयाच्या पाच वर्षापर्यंत मेंदूचा 90 % विकास होतो. शाळा स्तरावर विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन केले जाते , त्याचप्रमाणे अंगणवाडीतील बालकांमधील कलागुणांचा शोध घेऊन त्यांना वाव देण्यासाठी अंगणवाडीतील बालकांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन केले .
-श्रीमती ज्योती बेल्हेकर
बालविकास प्रकल्प अधिकारी, जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here