हिंदवी अरण्ये स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत नगर जिल्ह्यात प्रथम

0
303

जामखेड न्युज——

हिंदवी अरण्ये स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत नगर जिल्ह्यात प्रथम

हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा मुली शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु.हिंदवी चंद्रकांत अरण्ये हिने 200 पैकी 194 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

हिंदवी अरण्ये ही जि.प.खर्डा मुले शाळेतील आदर्श शिक्षक श्री. चंद्रकांत अरण्ये यांची ती कन्या आहे.शाळेच्या या हिंदवीला शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव गिते, वर्गशिक्षिका श्रीम.माणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे, गटविकास अधिकारी प्रकाशपोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे,विस्ताराधिकारी सुरेश कुंभार, खर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख राम निकम ,सोनेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गोलेकर, जामखेड तालुक्याचे यांच्यासह सर्व शिक्षकांनी शाळेचे व हिंदवीचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here