जामखेड न्युज——
दिव्यांग शिक्षक बळीराम जाधव यांना सुमतीबाई गोरे ट्रस्ट चा राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार जाहीर
सुमतीबाई गोरे ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराची सुरूवात केली आहे.शिक्षकांमधील शैक्षणिक उत्तरदायित्व, शैक्षणिक काम, सामाजिक काम, साहित्यिक रुची, समाजासाठी स्वतः चे अर्थिक योगदान, स्वतःची वाढवलेली शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टींचा विचार करून ट्रस्टच्या वतीने निवड केली जाते.यावर्षी साधारण ७०प्रस्ताव महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांकडून प्राप्त झाले होते त्यातील सर्वोच्च २०शिक्षक निवड समितीने निवडले आहेत.दरवर्षी प्रस्ताव न मागवता एक विशेष पुरस्कार दिला जातो तो यावर्षी अक्षरनंदन शाळेचे आदर्श शिक्षक अनिल आंधळे यांना जाहीर झाला आहे.
ही माहिती प्रकल्प प्रमुख सोपान बंदावणे,कार्यकारी विश्वस्त राधाताई शिरसेकर,सुरेश धनकवडे,प्रभा गोगावले, रजनीताई धनकवडे,ज्योती मते,संगिता गोवळकर यांनी दिली . पुरस्कार वितरण रविवार दि १२मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध साहित्यिक व ९५व्या साहित्य संमेलन अध्यक्ष मा भारत सासणे यांच्या उपस्थितीत उद्यान कार्यालय, सदाशिव पेठ,पुणे येथे सायं ४वा संपन्न होणार आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी.
१)अनिल आंधळे, अक्षरनंदन,शाळा,पुणे-विशेष पुरस्कार
२)गोकूळ पाटील,जि प शाळा निकुंभे,जि – धुळे
३) सुनिता काटम,जि प शाळा वडगाव बांडे ता -दौंड, पुणे
४)ललिता कारंडे,दां स रेणावीकर विद्यामंदिर सावेडी, अहमदनगर
५) विठ्ठल जाधव,जि प प्रा शाळा उकीर्डा चकला, शिरूर कासार बीड
६)स्पृहा सुरेश इंदू, चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्रा शाळा चेंबूर, मुंबई
७) अनुराधा केदार,जि प प्रा शाळा रांजणी,ता पाथर्डी अहमदनगर
८) नितीन मोटे शिवछत्रपती विद्यालय वडगाव बु पुणे
९) संतोष लिमकर, जि प प्रा शाळा लोहटा,ता कळंब,उस्मानाबाद
१०)प्रिती जगझाप, जि प उच्च प्राथमिक शाळा बामणी, बल्लारपूर जि चंद्रपूर
११) बळीराम जाधव,जि प प्रा शाळा भुतवडा, जामखेड जि अहमदनगर
१२)ज्योती पोकळे,शिशुविहार प्रा शाळा एरंडवणा,पुणे
१३) लक्ष्मण कावळे,एन व्ही एस मराठवाडा प्रा शाळा जि परभणी
१४) नर्मदा कनकी, नू. म.वि मराठी शाळा सोलापूर
१५)मिनाक्षी नागराळे,जि प प्रा शाळा कोकलगाव,ता.वाशिम जि – यवतमाळ
१६)आरूंधती फल्ले,जि प प्रा शाळा सूस,ता मुळशी जि,पुणे
१७) श्रीकांत देवकर,पं दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर म न पा शाळा क्र 74जी ,पुणे
१८) रंजना पवार,गेनबा सोपानराव मोझे प्रा प्रशाला येरवडा,पुणे
१९) हेमलता चव्हाण कै डॉ य ग शिंदे विद्यानिकेतन मनपा शाळा कात्रज,पुणे
२०) मनिषा कदम, नवीन मराठी शाळा शनिवार पेठ ,पुणे
२१) सुवर्णा रेणुसे,मनपा शाळा क्र 95जी कोंढवा बु,,पुणे
उपक्रमशील शिक्षक श्री बळीराम जाधव सर हे विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.या पुरस्काराबद्दल बळीराम जाधव सरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सरांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा