करमाळा जामखेड रस्त्यावर भीषण अपघात, एक ठार दोन जखमी नान्नज परिसरात शोककळा

0
252

जामखेड न्युज——

करमाळा जामखेड रस्त्यावर भीषण अपघात, एक ठार दोन जखमी

नान्नज परिसरात शोककळा

करमाळा जामखेड रस्त्यावर झिक्री शिवारातील लोकसेवा मंगल कार्यालयाजवळ मोटारसायकल व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव इंजमाम अहमद पठाण (वय २३) रा. नान्नज ता. जामखेड असे आहे.

यातील मयत व जखमी तरूण आपल्याकडील स्कुटी गाडीवर नान्नजकडून जामखेडकडे तर स्विफ्ट कार जामखेडकडून नान्नजकडे जात होती. ही दोन्ही वाहने झिक्री शिवारातील लोकसेवा मंगल कार्यालयाजवळ आली असता दोन्ही वाहनांचा समोरासमोर येऊन जोरदार धडक झाल्याने मोटारसायकलवरील इंजमाम अहमद पठाण (वय २३) हा मयत तर सोहेल मस्जिद पठाण वय २२ व मुदस्सिर मस्जिद पठाण वय १८ हे गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर मयत इंजमाम अहमद पठाण याचेवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब तागड हे तपास करीत आहेत तर त्यांना पोलीस नाईक अजय साठे हे सहकार्य करत आहेत. या घटनेतील मयत इंजमाम अहमद पठाण याच्या मृत्यूमुळे नान्नज परिसर हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाहनचालकांनी आपली वाहने सावकाश चालवावीत जास्त वेग असल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटते यामुळे अपघात होतात. तसेच १८वर्षाखालील मुलांच्या हातात गाडी देऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here