जामखेड न्युज——
सोनेगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा
पाटोदा तालुक्यातील सोनेगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमासह भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये समुह नृत्य व वैयक्तिक नृत्य होणार आहेत तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. १७ रोजी ७ ते १० सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवार दि. १८ रोजी ८ ते ११ रांगोळी स्पर्धा तसेच ६ ते ११ राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा तर रविवार दि. १९ रोजी ७ ते १० शिवज्योत यात्रा व प्रतिमा पुजन तसेच भव्य मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धेत पुढील प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.
प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये, सचिन भैय्या चौरे यांच्या तर्फे ठेवण्यात आले आहेत.
द्वितीय बक्षीस सात हजार रुपये केशव बापू रसाळ यांच्या तर्फे ठेवण्यात आले आहेत.
तृतीय बक्षीस पाच हजार रुपये मोरया कलेक्शन लिंबागणेश विनोद शेठ चौरे यांच्या तर्फे ठेवण्यात आले आहेत.
वैयक्तिक नृत्य स्पर्धेत पुढील प्रमाणे ठेवण्यात आले आहेत
प्रथम बक्षीस पाच हजार रुपये इंजि. कृष्णा चौरे युवा सेना तालुकाप्रमुख
द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये इंजि अतुल महाराज येवले प्रसिद्ध शिवव्याख्याते
तृतीय बक्षीस दोन हजार रुपये शिवाजी सगळे युवा नेते भाजपा
अशा प्रकारे बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.
नियम व अटी
स्पर्धकांने गाण्याची पेन ड्राईव्ह सोबत आणावी,
स्पर्धक हा १४ वर्षांपुढील असावा,
वैयक्तिक नृत्य स्पर्धेत एन्ट्री फी दोनशे रुपये तर समुह नृत्य स्पर्धेत तीनशे रुपये राहिल
विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल
नावनोंदणी १७ फेब्रुवारी पर्यंत करावी
कार्यक्रमाचे ठिकाण – हनुमान मंदिर मैदान, सोनेगाव
सहभागी स्पर्धकांसाठी संपर्क
इंजि. संभाजी चौरे मो. नं. 8788117421
सुनील चौरे मो. नंबर 9503169990
श्रीहरी चौरे मो. नंबर 9623088010
कार्यक्रमाचे निमंत्रक
अध्यक्ष – संभाजी चौरे
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सोनेगाव
उपाध्यक्ष – उमेश चौरे पाटील
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती