खोट्या व बनावट निवेदनाद्वारे प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत -पांडुराजे भोसले

0
187

जामखेड न्युज——

खोट्या व बनावट निवेदनाद्वारे प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत -पांडुराजे भोसले

खोट्या व बनावट निवेदनाद्वारे प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करावेत व या प्रकरणाची पोलीस अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, दि २ जानेवारी २०२३ रोजी मा. तहसीलदार साहेब, मुख्यआधिकारी साहेब नगरपरिषद जामखेड व इतर प्रशासकीय आधिकारी यांना अजहरोद्दीन मु. काझी या ईसमाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी निवेदन दिले असे समजले त्याबाबत मी मा. मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद यांना रितसर अर्ज करुन सदर निवेदनाची छायांकित प्रत मिळवली व त्याचे अवलोकन केले असता सदर निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास विरोध आहे असे निदर्शनास आले.

म्हणून मी या बाबत निवेदनावर सह्या करणाऱ्या व्यक्तींकडे चौकशी केली असता सदर निवेदनावर आम्ही सह्याच केल्या नसुन आम्हाला याबाबत काहीही माहीती नाही असे देखील त्यांनी सांगितले.
सदर निवेदन कर्ता हा राजकीय उद्देशापोटी रस्ता रूंदीकरण झाल्यानंतर होणाऱ्या शिव स्मारकास विरोध करून जामखेड शहाराचे सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.


सदर निवेदनावर सह्या करणाऱ्या काही ईसमाची पार्श्वभुमी ही गुन्हेगारी असल्याचे समजते. त्यामुळे अजहरोद्दीन मु. काझी याचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास असलेला विरोध हा राजकीय स्वरुपाचा दिसुन येत आहे. स्मारकास विरोध करून धार्मिक तेड निर्माण करण्याचा उद्देश असुन यामुळे जामखेड शहराची शांतता भंग होऊ शकते सदर निवेदन कर्त्यास वेळीच न रोखल्यास अगामी काळ हा निवडणुकीचा असुन शहारातील वातावरण दुषित होऊ नये यासाठी संबधीतांची सक्षम पोलिस आधिकारी यांच्या कडुन चौकशी करण्यात यावी व अजहरोद्दीन मु. काझी व त्याच्या सहकाऱ्यांवर कायदेशीर गुन्ह्ये दाखल करुन संबधीतांची व त्यांनी दिलेल्या निवेदनाची चौकशी करण्यात यावी.

अन्यथा शहारातील वातावरण दुषित होउन काही विपरीत घडल्यास त्यास प्रशासन सर्वस्वी जवबादार राहील यांची नोंद घ्यावी. असे निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले यांनी दिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here