जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस पकडले

0
283

जामखेड न्युज——

जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस पकडले

जामखेड तालुक्यातील सावरगाव येथील महिलेच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना विसापुर जिल्हा खुले कारागृहातून १ वर्षापासून फरार असलेला व फरार झाल्याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला जामखेड तालुक्यातील सावरगाव येथील फरारी आरोपी विजय गहिनीनाथ चव्हाण यास मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. व त्यास पुनश्च कारागृहात दाखल करणे कामी रवाना करण्यात आलेले आहे. अशी माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की. जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे सन-२०१० साली विजय गहिनीनाथ चव्हाण याने एका महिलेचा खुन केलेला होता. त्याचे विरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं.२६१/२०१० भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होऊन या गुन्हयाचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक दिवंगत ज्ञानेश्वर ढोकले व त्यांचे पथकाने करुन आरोपी याचे विरुध्द मा. न्यायालयात भरभक्कम पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केलेले होते. त्यानुसार सदर खटल्याची मा. जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांचे न्यायालयात सुनावणी होवुन आरोपी याचे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने सन २०१२ मध्ये त्यास मा. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासुन आरोपी विजय गहिनीनाथ चव्हाण हा विसापुर जिल्हा खुले कारागृह, विसापुर ता. श्रीगोंदा येथे शिक्षा भोगत होता.

मात्र शिक्षा भोगत असताना मागील ०१ वर्षापुर्वी विजय गहिनीनाथ चव्हाण हा विसापुर जिल्हा खुले कारागृह, विसापुर ता. श्रीगोंदा येथून फरार झालेला होता. त्या बाबत त्याचे विरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा देखील नोंदविणेत आलेला आहे.

सदर फरारी विजय गहिनीनाथ चव्हाण हा अधुन-मधुन जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे येत असल्याची माहिती मिळालेने मागील ३ महिन्यांपासून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे व पोलीस काॅन्स्टेबल सचिन पिरगळ हे त्याचेवर पाळत ठेवून होते. परंतु तो गुंगारा देण्यास यशस्वी होत होता.

परंतु दि. ०४/०२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीचे आधारे पोलीस अंमलदार पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश जाधव, सचिन पिरगळ व चालक पोलीस हेडकॉन्टेबल भगवान पालवे यांनी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत बारकाईने व गोपनीयरीत्या त्याची माहिती काढून तसेच त्याचेवर नजर ठेवून मोठया शिताफीने सावरगाव ता. जामखेड येथे ताब्यात घेवुन त्यास अटक केलेली आहे. सदरचा बंदी यांस पुनश्च कारागृहात दाखल करणेकामी रवाना करण्यात आलेले आहे.अशी माहिती जामखेड पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.

चौकट

जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे. राज्य व परराज्यातील अनेक कुख्यात फरारी गुन्हेगारांना अटक करून संबंधित पोलीसांच्या ताब्यात दिले आहेत. तसेच खाजगी सावकारी, महिला सुरक्षा, वाहतूक नियंत्रण अशा विविध क्षेत्रातील गुन्हेगारी नियंत्रणात आणून जामखेड शहर व पोलीस स्टेशन हद्दीत शांतता निर्माण केली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे जनतेत कौतुक केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here