जामखेड न्युज——
कालिका पोदार लर्न स्कुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला संसदीय कामकाजाचा अनुभव

देशाच्या संसदेचे कामकाज कसे चालते शपथविधी सोहळा, दिवंगन्त व्यक्तीस श्रदांजली , परदेशी सरकारी प्रतिनिधींचे स्वागत, प्रश्नोत्तराचा तास, अविश्वास ठराव, आणि विधेयक पारित करणे कायदा अशा वेग वेगळ्या कृती आमच्या विद्यार्थ्यांनी संसदेच्या कामकाजातून पार पाडल्या आणि नवीन कायदे बनवण्याचा ठोस अनुभव आज जाणून घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांची भुमिका बजावली संसद अवतरली असेच वातावरण निर्माण झाले होते.

कालिका पोदार लर्न स्कूल जामखेडच्या विद्यार्थ्यांसाठी २ फेब्रुवारी 2023 रोजी ही मोठी पर्वणी होती, इयत्ता 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी संसदीय कार्य कामकाज उत्कृष्टपणे सादर केले, ज्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना संसदेच्या कामकाजाचा व्यावहारिक अनुभव कळला, तो म्हणजे शपथविधी सोहळा, दिवंगन्त व्यक्तीस श्रदांजली , परदेशी सरकारी प्रतिनिधींचे स्वागत, प्रश्नोत्तराचा तास, अविश्वास ठराव, आणि विधेयक पारित करणे कायदा अशा वेग वेगळ्या कृती आमच्या विद्यार्थ्यांनी संसदेच्या कामकाजातून पार पाडल्या आणि नवीन कायदे बनवण्याचा ठोस अनुभव आज जाणून घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय प्राचार्य प्रशांत जोशी यांनी केले आणि संचालन श्री अॅलेक्स फिग्रेडो यांनी केले. विद्यार्थ्यांनी ही कृती उत्तमरीत्या पार पाडली आणि आपल्या देशाचे संसदेचे कामकाज कश्या प्रकारे चालते याचा अनुभव घेतला.
या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल स्कुलचे संस्थापक , मुख्याध्यापक ,शिक्षक आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांसाठी हा खूप उत्कृष्ठ शिकण्याचा अनुभव होता. कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड भविष्यात अशा प्रकारचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी कटिबद्ध आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील व्यवहारिक अनुभव मिळेल.


