जामखेड न्युज——-
बारामतीची नथ नकली – आशाताई शिंदे
बिभीषण धनवडे आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमात सौ. शिंदे यांचे धक्कादायक विधान
वर्षापूर्वी आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड तालुक्यातील विविध गावात खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करत बक्षिसे म्हणून नथ, पैठणी दिले होते पण हि नथ नकली असल्याची माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे यांनी आज ल. ना. होशिंग येथील बिभीषण धनवडे आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमात धक्कादायक माहिती दिली.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे, नगरसेवक अमित चिंतामणी, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, प्रा. अरूण वराट, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, रमेश वराट, सुमीत वराट, गोरख घनवट, श्याम धस, संजय राऊत, सलीम तांबोळी, प्रा कैलास माने, सलीम बागवान, महेश मासाळ, तात्याराम पोकळे, मोहन देवकाते, जयसिंग उगले, वैभव कार्ले, ऋषीकेश मोरे, जंगदबा महिला मंडळ, रवी सुरवसे, अँड प्रविण सानप, लहू शिंदे, उद्धव हुलगंडे, प्रविण चोरडिया, डॉ. विठ्ठल राळेभात, विकी उगले यांच्या सह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आशाताई शिंदे यांनी सांगितले की, अरणगाव येथील आजीबाईंना आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार आयोजित
खेळ पैठणीचा कार्यक्रमात नथ मिळाली काही दिवसात घरात चोरी झाली आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरांनी चोरून नेले तेव्हा गळ्यात मणी असावेत म्हणून आजीबाई बक्षीस मिळालेली नथ मोडण्यासाठी गेल्या तर सोनाराने नथ पाहिली चेक केली असता ती नकली असल्याचे सांगितले हे ऐकून आजींना धक्का बसला नकली नथीचा गौप्यस्फोट आशाताई शिंदे यांनी केला आहे.
“बारामती पर्व खोटे ठरले सर्व” आपले खरे आहे का❓ असा प्रश्न बिभीषण धनवडे यांना शिंदे यांनी विचारला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक बिभीषण धनवडे यांनी करताना सांगितले की, रोजच्या धकाधकीच्या जीवनात मन मोकळे करण्यासाठी महिलांना खळखळून हसवण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे. असे सांगितले.
मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा न्यु होम मिनिस्टरचा भरगच्च कार्यक्रम ल. ना. होशिंग विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला होता. यासाठी अभिनेता क्रांती ( नाना) मळेगांवकर गप्पा, गोष्टी, रंजक खेळासोबत गावरान काँमीडीचा तडका झाला तसेच बालगायीका टी. व्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर हिने माताभगिनींची मने जिंकली.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा न्यु होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी प्रथम बक्षिस १२५५१ रूपये किंमतीची पैठणी, द्वितीय बक्षीस ७००० रुपयांची पैठणी, तृतीय पाच हजार रुपयांची पैठणी, चतुर्थ २१०० रूपयांची पैठणी, पाचवे बक्षीस १५०० रूपयांची पैठणी असे भरगच्च बक्षिसे देण्यात आली