जामखेड तालुक्यात शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय मदत कक्ष सुरू युवासेना प्रमुख सुमित वराट यांच्या कार्यालयात कक्ष सुरू

0
264

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय मदत कक्ष सुरू

युवासेना प्रमुख सुमित वराट यांच्या कार्यालयात कक्ष सुरू

 

जामखेड तालुका बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख प्रा. कैलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रमुख सुमित वराट व त्यांचे सहकारी जामखेड येथे वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असुन जामखेड येथिल पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील सेंट्रल कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या युवासेनाप्रमुख संपर्क कार्यालयात सदरचा मदत कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती युवासेनाप्रमुख सुमित वराट यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.

जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याच्या उद्देशाने जामखेड येथे देखील गरजु व गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य कक्ष सुविधा सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाकडून ज्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी अर्थसाहाय्य दिलं जातं त्यात कॅन्सर, ब्रेन ट्युमर,किडनी, लिव्हर इन बोनमॅरो ट्रान्सप्लांट, बायपास, मोतीबिंदू, एनजिओप्लास्टी, कोकलियर इमप्लांट, लहान मुलांच्या हृदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रिया आदी तत्सम शस्त्रक्रियांचा समावेश आहे. वीस हजारात पासुन ते दोन लाखांपर्यंत हे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून मिळते.

सदरचे मदत कक्ष युवासेनाप्रमुख प्रमुख सुमित वराट यांच्या युवासेना संपर्क कार्यालय जामखेड सेंट्रल कॉम्प्लेक्स पंचायत समिती कार्यालया समोर या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे तसेच गरजु रुग्णांनी 9004844007 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुमित वराट यांनी केले आहे.

ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण यानुसार शिवसेना जामखेड शाळेमार्फत युवासेना प्रमुख सुमित वराट आपले कामकाज करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here