जामखेड न्युज——
श्री नागेश विद्यालयात एक हजार विद्यार्थी साकारणार प्रजासत्ताक दिन नाव

रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.20 वा
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 1000 विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन “प्रजासत्ताक दिन” नाव साकारून करून प्रजासत्ताक दिना निमित्त मानवंदना देणार आहेत.

एनसीसीचे उत्कृष्ट संचलन व मानवंदना होणार आहे. तरी या राष्ट्रीय कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमीनी उपस्थिती असे आव्हान विद्यालयाच्या प्राचार्य मडके बी. के यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे.

या नावासाठी नागेश विद्यालयचे पाचशे विद्यार्थी व कन्या विद्यालयाच्या पाचशे विद्यार्थ्यांनी व एनसीसी कॅडेट यांनी सहभाग घेतला आहे.

श्री नागेश विद्यालयाचे ध्वजारोहण सकाळी 7.20 मिनिटांनी होणार आहे. 8.30 वाजेपर्यंत हे नाव सर्वांना पाहता येणार आहे. सर्वांनी वेळेत विद्यालयात उपस्थित रहावे. व हे विलोभनीय दृश्य आपल्या नजरेत कैद करावे. असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


