जामखेड न्युज——
कालिका पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची पवनचक्कीला भेट
पवनचक्की कार्यपद्धतीबद्दल जाणून घेतली सविस्तर माहिती
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड च्या विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य वातावरणात पवनचक्कीला भेट देत व्यवहारीक ज्ञान घेत पवनचक्कीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.
सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसळंब गावात पवन चक्कीला भेट देण्याचा आनंदाचा प्रसंग होता. या भेटीचे आयोजन मुख्याध्यापक श्री.प्रशांत जोशी यांच्यासह श्री.अविनाश खेडकर, श्री. वैभव झरकर यांनी केले होते.
विद्यार्थ्यांनासमावेत स्टाफ श्री.अविनाश खेडकर श्री.अॅलेक्स फिग्रेडो, श्री.किशोर हरणे, प्रियांका मुंजाल आणि तस्लिमा शेख हे उपस्थित होते. तसेच अधिकारी श्री राजेंद्र डोंगरे, श्री. सागर अग्रवाल, श्री.बाप्पू टेकाळे, व मा.दादासाहेब बनकर. यांनी पवनचक्की बाबत महत्वपूर्वक माहिती दिली.
त्यांनी त्यांचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आणि पवन चक्कीच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली, त्या सर्व अधिकाऱ्यांची शाळा नेहमीच आभारी आहे. विद्यार्थ्यांना पवन चक्कीबाबत कार्य समजून घेण्यासाठी ही मोहीम अतिशय फायदेशीर ठरली.
कालिका पोदार लर्न स्कूलची नेहमीच इच्छा असते की अशा भेटीतून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिकावे, कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान अधिक महत्त्वाचे आहे असे आमचे ठाम मत आहे. विद्यार्थ्यांना अधिक ठोस अनुभव देण्यासाठी शाळा भविष्यात अशा अधिक अधिक भेटींचे आयोजन करणार आहे. असे कालिका पोदार लर्न स्कूलचे शिक्षक व व्यवस्थापकांनी सांगितले.