संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात हळदी – कुंकू समारंभ संपन्न हजारो महिलांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ संपन्न

0
272

जामखेड न्युज——

संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात हळदी – कुंकू समारंभ संपन्न

हजारो महिलांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ संपन्न

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी – कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यामध्ये लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. हळदी कुंकू समारंभसाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेस हमखास बक्षीस मिळाले. निमंत्रक रोहिणी संजय काशिद यांनी सर्वांचे स्वागत केले.

 

आयोजन रोहिणी संजय काशिद यांनी खर्डा रोडवरील जगदंबा लाँन्स येथे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता यासाठी हजारो महिलांची उपस्थिती हे खास वैशिष्ट्य ठरले.


रोहिणी काशिद यांना त्यांच्या सहकारी योगिता निलेश भोसले, सोनाली पांडुरंग भोसले, वैशाली शिंदे, ज्योती राऊत, कांचन दाहितोडे यांनी मदत केली.
यावेळी अँड स्नेहल फुटाणे, सरपंच ऋतूताई काशिद, डॉ. प्रियंका चौरे, डॉ. विद्या काशिद, सौ, तनुजा सुशील पन्हाळकर, सौ, डॉ स्वेताताई शिंदे, सौ. प्रभाताई रासकर, श्रद्धा जगताप, साक्षी जाधव, वैशाली शिंदे, दिपाली भोसले, सारिका जमदाडे, कुसुम वराट, संगिता थोरवे, दाहितोडे मँडम, ज्योती राऊत यांच्या सह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मीना बेलेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने जामखेड तालुका शिवसेना प्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने खर्डा रोडवरील जगदंबा लाँन्स जामखेड येथे हळदी कुंकू निमित्त लकी ड्रॉ आयोजित करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित केले होते. सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू दिल्या गेल्या. हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने नेहमीच शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.

नगर जिल्ह्यातील पहिलीच महिला आयोजित भव्य दिव्य शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली होती. परिसरातील वीर माता तसेच विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला होता. याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला होता.

शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मोफत शिवकालीन शस्त्रक्रला प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला व मुलींनी सहभाग नोंदविला होता. स्व संरक्षणासाठी हे शिबीर खूपच उपयोगी पडले अशी प्रत्येक मुलांची भावना होती.

याचबरोबर परिसरात वृक्षारोपण, अनाथाश्रम. वृद्धाश्रम यांना मदत, विविध कार्यक्रम प्रसंगी रक्तदान शिबीराचे आयोजन असे विविध सामाजिक उपक्रम सतत चालू असतात.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू निमित्त लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे यासाठी प्रथम बक्षीस पैठणी साडी, द्वितीय बक्षीस एक ग्रॅम नेकलेस तर तृतीय बक्षीस डिनर सेट याचबरोबर सहभाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेस बक्षीस दिले गेले. येणाऱ्या प्रत्येक महिलेचे आयोजक रोहिणी काशिद यांनी स्वागत केले. सुमारे दीड ते दोन हजार महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here