जामखेड न्युज——
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त
डॉ. ज्ञानेश्वर झेंडे मित्रमंडळाच्या वतीने साडी वाटप करून वीटभट्टीमजूर महिलांचा सन्मान

तालुक्यातील वीट उत्पादक मजुर महिलांना आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, वैशाली झेंडे यांच्या वतीने जामखेड परिसरातील सुमारे पाचशे एक वीटभट्टीमजूर महिलांना साडी वाटप करून सन्मान करण्यात आला तसेच सर्वाना मिष्टान्न भोजनाची सोय करण्यात आली.

आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त
पाचशे एक महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी वीट उत्पादक संघटना, डॉ ज्ञानेश्वर झेंडे
गणेश मेंढकर, आजीनाथ निमोणकर, नारायण जमदाडे, डॉ. विठ्ठल राळेभात, डॉ. बाळासाहेब बोराटे, डॉ. अल्ताफ शेख, तात्यासाहेब पोकळे, नगरसेवक वैशाली झेंडे, ओंकार झेंडे,पोपट (नाना) राळेभात, अर्जुन म्हेत्रे, हाज कमिटीचे संचालक सलीम बागवान, संपत राळेभात, शहाजी राऊत, नारायण राऊत यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. ज्ञानेश्वर झेंडे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी नवीन वर्ष व आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे पाचशे एक महिलांना साडी वाटप करण्यात आले यामुळे मजुरी करणाऱ्या महिलांना साडी मिळाल्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.

चौकट
दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने आम्ही सामाजिक उपक्रम राबवितो. यावर्षी काही अडचणींमुळे वीटभट्ट्या तब्बल एक महिना उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे येथे काम करणाऱ्या मजुरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ही बाब आमदार राम शिंदे यांच्या निदर्शनास आली. वीट
उत्पादकांनीही त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या अडचणी आ. शिंदे यांनी सोडवल्या. वीटभट्टीवर मजुरी करुन उपजिविका करणाऱ्या मजुरांची आ. शिंदे यांच्या समवेत भेट व्हावी, संवाद साधला जावा, यासाठी मित्रमंडळाच्या पुढाकाराने साडी वाटप व मिष्टान्न भोजन देऊन त्यांचा सन्मान करण्याचा आम्ही निर्णय घेतला.
– डॉ. ज्ञानेश्वर झेंडे (चेअरमन, पुण्यश्लोक संस्था, जामखेड.)





