जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात पाणी जर आलं तर मीच आणू शकतो – आमदार राम शिंदे
25 वर्षे तुकाई चारीचं काम लोकं मागत होते, ते काम मी मंजुर केलं, ज्या 22 गावात पाणी न्यायचं ठरवलयं त्यातील एकाही गावात 2019 ला मी पुढं नाही, मी म्हणलं असं का झालं? लोकं म्हणली, यालाच म्हणत्येत राजकारण, जवर देतो म्हणतो तवर लोकं मागं असत्यात, एकदा दिल्यावर लोकं म्हणतात दुसरं घर बघा, याने तर दिलयं आता पुढं काय देणारयं, असं झालयं का?
असं करायला पाहिजे का? नाही पाहिजे, पण तुम्हाला सांगतोय, जामखेड तालुक्यात पाणी जर आलं तर मीच आणू शकतो, असे दावा आमदार राम शिंदे यांनी हळगाव पिंपरखेड दौऱ्यात बोलताना केला.
कुकडीचे पाणी आणू असं ते म्हणत होते, पण त्यांनी अडीच वर्षांत परत शब्द काढला नाही,आता म्हणतेत महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरविला, माझं ओपन चॅलेंज आहे अख्खा निवडणुकीत हा शब्द त्यांनी कधी वापरला असेल तर समोरा समोर बसून चर्चा करू, ते म्हणले अश्वासन दिलं होतं निवडणुकीत, तुमच्या अश्वासनाचा आणि याचा काय संबंध? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अख्ख्या देशासाठी हर घर नल जलजीवन मिशन योजना राबवली आहे.
त्याचं श्रेय विरोधक घेत आहेत. आम्ही महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला अनेक विकास कामे लावली. अनेक मंजुऱ्या आणल्या आणी विरोधकांनी अडीच वर्षे नारळ फोडण्यात घातली अशी टिका आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.