सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले -विजयकुमार जाधव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती उत्साहात साजरी

0
166

जामखेड न्युज——

सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले -विजयकुमार जाधव

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती उत्साहात साजरी

सावित्रीबाईंनी आपल्या संसाररूपी सुखी जीवनाचा त्याग करत मुलींच्या आणि महिलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले.  असे मत विजयकुमार जाधव यांनी व्यक्त केले. 
३ जानेवारी या दिवशी भारत देशातील पहिल्या महिला  शिक्षिका व  मुख्याध्यापिका  ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले यांच्या जन्मदिनी बालिकादिन म्हणून देशभर साजरा केला जातो. बालिका दिनाचे औचित्य साधून 3 जानेवारी रोजी जामखेड येथील जामखेड महाविद्यालय जामखेड मध्ये सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा देताना श्री. विजय जाधव  प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणून विचारपीठावरून बोलत होते.
सावित्रीबाईंनी आपल्या संसाररूपी सुखी जीवनाचा त्याग करत मुलींच्या आणि महिलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. सावित्रीमाईंच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयीन विद्यार्यांना प्राचार्य डॉ. एम.एल. डोंगरे सर यांनी मागदर्शित केले. 
यावेळी उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके उपस्थित होते.
ओघवते प्रास्ताविक डॉ. देशपांडे मॅडम यांनी केले. तर उत्कृष्ट सुत्रसंचालन डॉ. नामदेव म्हस्के सर यांनी केले.
सावित्रीबाई फुलेंच्या विचारांवर प्रकाश टाकत प्रा. अविनाश फलके सर यांनी उपस्थितांचे आभार मानले..
यावेळी NSS कॅम्पचे श्री. तुकाराम घोगरदरे यांच्यासमवेत जामखेड महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here