ल.ना.होशिंग विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

0
233

जामखेड न्युज——

ल.ना.होशिंग विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

  • आज ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिवस व महिला मुक्ती दिन अतिशय उत्साही वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.
    संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुलींनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीकांत होशिंग साहेब होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ यांनी केले.
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मुलींचे शिक्षण यावर आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवन प्रवास यावर आपले मनोगत व्यक्त केले.
  • विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
    त्यामध्ये पुण्यमय दे आम्हा अक्षर वरदान* इयत्ता सहावी,सातवी,आठवी मधील मुलींनी गीत सादर केले त्यानंतर कथाकथन चिं.प्रणव वारे इयत्ता पाचवी याने लुगड्याची गोष्ट अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग कु.शिवानी राळेभात इयत्ता सातवी हिने सादर केला. त्यानंतर कु.सुमेधा कदम इयत्ता नववी व कु. रिफा शेख इयत्ता नववी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अतिशय उत्कृष्ट असे भाषण केले.

  • त्यानंतर फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का हेसुंदर असे गीत सादर केले त्यानंतर नाटक बालिका दिवस इयत्ता सातवी मधील मुलींनी सादर केले.
  • अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग यांनी सर्व सहभागी मुलींचे सुंदर सादरीकरण यासाठी अभिनंदन करून कौतुकाची थाप दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका, शिक्षणाच्या प्रणेत्या,आदर्शसमाजसेविका
    याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सर्व क्षेत्रात महिलांनी केलेली प्रगती हे सर्व श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाच आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती संगीता दराडे, सौ सुप्रिया घायतडक, श्रीमती वंदनाअल्हाट,श्रीमती पूजा भालेराव, श्रीमती रासकर, श्रीमती. वाकळे,  साई भोसले सर,श्री सुरज गांधी सर,श्री विजय क्षीरसागर सर,श्री आदित्य देशमुख सर यांनी खूप मेहनत घेतली.
    सूत्रसंचालन कु.अल्फीया आतार हिने केले,कु.गौरी म्हेत्रे तिने आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here