जामखेड न्युज——
समित मोरे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समित भास्करराव मोरे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रत्नदीप शैक्षणिक संकुलात पाचशे औषधी वनस्पतींचे रोपन करून रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएचएमएस,नर्सिंग व फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव व संशोधन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती रत्नदीप शैक्षणिक संकुलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री.प्रशांत राळेभात यांनी दिली आहे.
यावेळी अहमदनगर येथील हृदय रोगतज्ञ, डॉ.गणेश मैड, डॉ.सागर सिंग, डॉ. शुभांगी पदमावार,डॉ.श्रध्दा पालसे,डॉ.वैष्णवी कदम आदी तज्ञ डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी केली. तसेच श्री कमला ब्लड बँक करमाळा यांच्या पथकाने श्री. रोहीत वायभासे व श्री. निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीरासाठी विशेष सहकार्य केले. नामांकित तज्ञ डॉक्टरांमार्फत रूग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्या आवश्यक सर्व आरोग्य विषयक तपासण्या देखील मोफत करण्यात आल्या. यावेळी दोनशे पस्तीस रूग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
या शिबिरात जामखेड व कर्जत तालुक्यातील दोनशे पस्तीस गरजु रूग्णांनी लाभ घेतला व एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्रप्राचार्य डॉ.संदीप सांगळे यांनी दिली.
यावेळी सर्व रक्तदात्यांचा रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या सचिव डॉ. सौ.वर्षा मोरे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी रत्नदीप संस्थेच्या सेक्रेटरी डॉ. सौ.वर्षा भास्करराव मोरे यांच्यासह रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.सर्फराज खान,रत्नदीप फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जितेंद्र कुमार, रत्नदीप नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ.प्रज्ञा पुजारी,डॉ.झेबा शेख,डॉ.संदीप सांगळे,श्री. संजय पोपळे, श्री.सुग्रीव घोडके,प्रशांत राळेभात, रवींद्र ढवळे, रोहित राळेभात,डॉ.श्रध्दा मुळे,डॉ.मनिषा बांगर,सौ.आयुषा खेडकर सौ.सोनाली मखर,डॉ.दिपाली सांगळे आदी उपस्थित होते.
चौकट:-
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या या संस्थेमार्फत सातत्याने नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात बीएचएमएस,नर्सिंग व फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालयासह शंभर खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आलेले आहे. संस्थेच्या रूग्णालयामार्फत जामखेड व कर्जत तालुक्यातील लोकांसाठी मोफत होंमिओपॅथिक व आयुर्वेदिक उपचार केले जात आहेत.तसेच संस्थेमार्फत जामखेड व कर्जत तालुक्यातील दहा गांवात ‘आयुष क्लिनिक’ सुरू करण्यात येणार असून त्यामार्फत देखील त्या गावातील व परीसरातील रुग्णांना मोफत होंमिओपॅथिक व आयुर्वेदिक उपचार केले जाणार आहेत.