Wednesday, February 11, 2026
Home राजकारण संजय वराट मित्रमंडळाच्या वतीने राजुरीच्या सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांचा सत्कार

संजय वराट मित्रमंडळाच्या वतीने राजुरीच्या सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांचा सत्कार

0
255

जामखेड न्युज——

संजय वराट मित्रमंडळाच्या वतीने राजुरीच्या सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांचा सत्कार

राजुरी ग्रामपंचायमध्ये अश्विनी सागर कोल्हे यांनी सरपंच पदी भरघोस मतांनी विजय प्राप्त केला याबद्दल जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट मित्रमंडळाच्या वतीने राजुरी येथे सत्कार करण्यात आला.

संजय वराट मित्रमंडळाच्या वतीने सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, पोलीस पाटील महादेव वराट, राजस्थान ग्रेनाइट अँड मार्बलचे संचालक शहादेव वराट, माध्यमिक शिक्षक संघटनेचे नगर जिल्हा हिशोबतपासणीस भरत लहाने, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, राजकुमार थोरवे, रामशेठ कोल्हे, सुनिता पिसाळ, सागर कोल्हे, धनंजय (आप्पा) कोल्हे उपस्थित होते.

राजुरी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी भरघोस मतांनी विजयी झालेल्या अश्विनी कोल्हे यांचे माहेर साकत आहे त्यामुळे साकत करांच्या वतीने विजयी सरपंच अश्विनी कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला

जामखेड तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागुन राहीलेल्या राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ आश्विनीताई सागर कोल्हे या भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत.

राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी भाजपकडून माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांच्या सौभाग्यवती वैशालीताई काळदाते तर राष्ट्रवादी काँग्रेस कडुन सागर कोल्हे यांच्या पत्नी सौ अश्विनीताई कोल्हे यांच्या मध्ये लढत झाली होती .या लढतीत सौ वैशालीताई काळदाते यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या पराभुत उमेदवार यांना 794 मते पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ आश्विनीताई सागर कोल्हे यांना 894 मते मिळाली आसल्याने सुमारे शंभर मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

राजुरी मध्ये नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या तर चिट्टीमुळे भाजपाची एक जागा वाढली यामुळे
भाजपला पाच जागा मिळविता आल्या आहेत.

 

राजुरी ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीन मधील सर्वसाधारण जागेवरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण या ठिकाणी गौतम आश्राजी फुंदे आणि मच्छिंद्र आश्रुबा फुंदे या दोन्ही उमेदवारांना समसमान 282 मते मिळाली होती. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या उपस्थितीत चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. श्रेया विजय भोरे या चिमुकल्या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये गौतम फुंदे हे विजयी ठरले

राजुरी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार अश्विनीताई सागर कोल्हे तर ग्रामपंचायत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडीया प्रमुख काकासाहेब कोल्हे यांच्या मातोश्री सुनिता मुकिंदा कोल्हे, मीनाक्षी संजय खाडे, किर्ती नानासाहेब खाडे, बाबासाहेब रामदास घुले असे सरपंच पदासह पाच जण विजयी झाले आहेत.

  • चौकट
  •   दोन वर्षांपासून केलेल्या सामाजिक कामामुळे गावाबरोबरच डोळेवाडी, एकबुर्जी, घुलेवाडी, बांगरवस्ती येथील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले यामुळे भरघोस मतांनी विजय संपादन करता आला. असे सागर कोल्हे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!