जामखेड न्युज——
जामखेडमध्ये होणार अद्ययावत सुसज्ज स्मशानभूमी
आमदार रोहित पवारांच्या हस्ते भूमीपूजन
शहराची लोकसंख्या पाहता शहरातील स्मशानभूमी वर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होतो त्यामुळे शहरासाठी सुसज्ज स्मशानभूमी व्हावी अशी शहरवासीयांची मागणी होती यानुसार आमदार रोहित पवारांनी तपनेश्वर स्मशानभूमी शेजारी जागा विकत घेतली व पाठपुरावा करत दोन कोटी रुपये मंजुरी मिळवली यानुसार स्मशानभूमी व सुशोभीकरणाच्या कामांचे आमदार रोहित पवारांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
जामखेड शहराच्या मोठ्या लोकसंख्येच्या भागासाठी असलेल्या तपनेश्वर स्मशानभूमीचे काम व्हावे ही जामखेड शहरवासीयांची अनेक वर्षांची मागणी होती. या मागणीचा विचार करून कर्जत जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी मोठा पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळविली. त्यामुळे हे जामखेड नगरपरिषद येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण करणे यासाठी २ कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. या निधीतून होत असलेल्या अद्यावत कामाचे आ. रोहित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, नगरसेवक मोहन पवार, शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल अहिरे, कुंडल राळेभात, समीर चंदन, प्रकाश काळे, सचिन शिंदे, प्रदिप शेटे, वैजीनाथ पोले, लक्ष्मण ढेपे, अमित जाधव, नितीन हुलगुंडे, उमर कुरेशी, जुबेर शेख, महेंद्र राळेभात, विकास राळेभात, निखिल घायतडक, रशिद शेख, प्रवीण दगडे, राऊत साहेब, सुनील राजगुरू, दत्तू उतेकर आदिंसह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून जामखेड शहरात होत असलेल्या विविध विकास कामांमुळे जामखेड शहर बदलताना दिसत आहे. काल भुमीपुजन केलेल्या स्मशानभूमीच्या कामाबरोबर नगरपरिषद, पोलीस वसाहत, पंचायत समिती इमारत, कर्मचारी निवासस्थान, सांस्कृतिक सभागृहात आदी अनेक कामे होत असल्याचे दिसून येत आहे.