Thursday, February 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या जामखेड महाविद्यालयातील एनसीसी च्या कॅडेट्सची राज्य स्तरावर चमकदार कामगिरी माऊली सोनावणे...

जामखेड महाविद्यालयातील एनसीसी च्या कॅडेट्सची राज्य स्तरावर चमकदार कामगिरी माऊली सोनावणे प्रथम तर हंबीरराव शुभम द्वितीय जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
254

जामखेड न्युज——

जामखेड महाविद्यालयातील एनसीसी च्या कॅडेट्सची राज्य स्तरावर चमकदार कामगिरी

माऊली सोनावणे प्रथम तर हंबीरराव शुभम द्वितीय

जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा 

राज्य स्तरावर जामखेड महाविद्यालयातील NCC कॅडेट्सची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आँलपिंक असोसिएशन महाराष्ट्र राज्य २०२२- २३ भोसरी पुणे येथे झालेल्या स्पर्धेत माऊली सोनावणे प्रथम तर हंबीरराव शुभम हा द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Student Olympics Association Maharashtra State Game 2022-23 भोसरी पुणे येथे सुरु असलेल्या Student Olympics Association Maharashtra State Game मध्ये NCC कॅडेट् माऊली सोनावणे हा प्रथम

तर कॅडेट हंबीरराव शुभम हा द्वितीय आला आहे. या दोन्ही कॅडेट खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पदक मिळविले आहे. त्या बदल हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

दोन्ही कॅडेटस् यांना वेळोवेळी कॅप्टन गौतम केळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे या यशाबद्दल 17 महाराष्ट्र बटालियन NCC अहमदनगर, चे Commanding Officer कर्नल चेतन गुरूबक्ष, लेफ्ट.कर्नल रणदीप सिंह , सुभेदार मेजर लोकेंद्र सिंह, संस्थेचे अध्यक्ष उद्धव (बापू) देशमुख, उपध्यक्ष अरुण (काका) चिंतामणी, संस्थेचे सचिव शशिकांतजी देशमुख, खजिनदार राजेश मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, तसेच सर्व संचालक मंडळ व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पदक विजेते खेळाडूंचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!