जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी भाजप झाली सज्ज चोंडीत नियोजन बैठक संपन्न – निवडणुकीत तगडे उमेदवार रिंगणात उतरवणार – आमदार राम शिंदे

0
172

जामखेड न्युज——

जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी भाजप झाली सज्ज

चोंडीत नियोजन बैठक संपन्न – निवडणुकीत तगडे उमेदवार रिंगणात उतरवणार – आमदार राम शिंदे

जामखेड बाजार समिती निवडणूकीसाठी भाजपा सज्ज झाली आहे. निवडणूकीच्या नियोजनासाठी आमदार राम शिंदे यांनी भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची चोंडी येथील निवासस्थानी आज बैठक घेतली. या बैठकीतून सर्वच कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.

जामखेड बाजार समितीच्या निवडणूक नियोजनासाठी आमदार राम शिंदे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आज चोंडीत जामखेड तालुक्याचा आढावा घेतला. या बैठकीत निवडणूकीचे गणित मांडण्यात आले. बाजार समितीसाठी सक्षम उमेदवारालाच उमेदवारी द्यावी,असा सुर या बैठकीत निघाला.

जामखेड बाजार समिती निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार आहे. अनेक कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत, सर्वांना विश्वासात घेऊन पुढील रणनिती ठरवण्यात येईल, ही निवडणुक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. गावोगावच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद आपल्या उमेदवारांच्या पाठीशी लावावी, या निवडणुकीत आपल्या पॅनलकडून तगडे उमेदवार दिले जाणार आहेत, उमेदवार निवडताना कोणाचाही वशिला चालणार नाही, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी बैठकीत बोलताना केले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अजय दादा काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, आप्पासाहेब ढगे, उदयसिंग पवार, प्रविण चोरडिया, डाॅ अल्ताफ शेख, आप्पासाहेब ढगे, प्रविण चोरडिया,बिट्टु मोरे, डॉ.गणेश जगताप,गौतम कोल्हे, राम पवार, वैभव कार्ले, अजय सातव, राहुल चोरगे,गणेश शिंदे,बाजीराव गोपाळघरे, तुकाराम कुमटकर हर्षल बांगर, महारुद्र महारणवर,मच्छिंद्र गिते, संदीप जायभाय, तान्हाजी फुंदे,भरत उगले, लहू शिंदे,पांडुरंग उबाळे, बापुराव ढवळे, सोमनाथ पाचरणे, डाॅ बाळासाहेब बोराटे,सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here