बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी कालानुरूप बदल करावा – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ पंचायत समिती जामखेड व बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून बचत गटांना 27 लाखांचे कर्जवाटप

0
240

 

जामखेड न्युज——

बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी कालानुरूप बदल करावा – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

पंचायत समिती जामखेड व बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून बचत गटांना 27 लाखांचे कर्जवाटप-

महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर शासनाचा भर आहे. केंद्र व राज्य सरकार बचतगट चळवळीला प्राधान्य देत आहे. बचतगटांची उत्पादने दर्जेदार आहेत. यामुळे पुरक व्यवसायाला चालना मिळत असून बचत गटांनी आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी काळानुरूप आकर्षक पॅकींग, ब्रॅन्डींग वर भर दिला पाहिजे. असे मत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले.

जातेगाव येथील 11 महिला स्वयंसहायता समूहांना 22 लाखाचे तसेच माळेवाडी येथील 5 महिला स्वयंसहायता समूहास 5 लाखाचे कर्ज वितरण बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जातेगावच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पंचायत विस्तार अधिकारी बापूराव माने, बँक मॅनेजर केशव तांदळे, ग्रामसेवक कैलास जाधव, प्रभाग समन्वयक हरिबा चांदगावे, ग्रामपंचायत उपसरपंच रविराज गायकवाड, सी आर पी वर्षा गायकवाड, अपेक्षा पाचणकर, कृषी सखी रेखा गायकवाड उपस्थित व गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की महिलांनी स्वतःला अबला न मानता स्वाभिमानाने पुढे आले पाहिजे. उमेदच्या माध्यमातून विविध बँकांचे कर्ज घेऊन छोटे-मोठे व्यवसाय केले पाहिजे. त्यातून अर्थार्जन सुरू झाले की महिला सक्षमीकरण अधिक गतीने करता येईल. लिज्जत पापडचा व्यवसाय 4 महिलांनी केवळ 80 रुपयात सुरू केला होता. आज शेकडो कोटी रुपयांचा व्यवसाय उभा झाला आहे.

स्वतःमधील क्षमता ओळखून उमेदच्या दशसूत्रीचे पालन करावे तरच महिलांचा सर्वांगीण विकास होईल. पंचायत समितीच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजनांमध्ये प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन पोळ यांनी दिले. यावेळी उपस्थित महिलांनी पोळ यांच्याकडे घरकुल व विविध योजनांचा लाभ गरजू महिलांना मिळण्याबाबत साकडे घातले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here