आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांनी विजेची अनियमितता दुर नायगाव ३३/११ केव्ही उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न

0
181

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांनी विजेची अनियमितता दुर नायगाव ३३/११ केव्ही उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न 

आ.रोहित पवारांच्या अथक प्रयत्नांनंतर विजेची अनियमितता झाली कायमची दूर; नायगाव ३३/११ केव्ही उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न

परिसरातील शेतकरी व वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची विजेची समस्या झाली कायमची दूर

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विजेची अनियमितता सुरळीत होण्यास आ.रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. विजेचे उपकेंद्र व लिंक लाईन टाकून मतदारसंघातील विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवार विशेष प्रयत्न करत आहेत. नुकतेच नायगाव येथे ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून या नवीन उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नायगाव ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्राचे काम पूर्ण झाल्यामुळे नायगाव, नाहुली, देवदैठण, बांधखडक, आनंदवाडी या गावांतील शेतकऱ्यांना तसेच गावांतर्गत येणाऱ्या वाड्या-वस्त्यांना फायदा होत आहे. दरम्यान, नवीन उपकेंद्रामुळे सध्याच्या उपकेंद्रांवर आलेला ताण कमी होण्यास मदत झाली असून त्यावर अवलंबून असणाऱ्या शिवूर, सारोळा, राजुरी, काटेवाडी, घोडेगाव, पिंपळगाव उंडा, पिंपळगाव आळवा, वाघा, आपटी या गावांना देखील उपकेंद्रावरील ताण कमी झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विजेची अडचणही दूर झाली आहे व सुरळीत आणि अखंडित व पूर्ण दाबाने वीजपुरवठा होण्यास मोठी मदत झाली आहे.

शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार रोहित पवार सतत पाठपुरावा करत आहेत. तसेच मतदारसंघातील विजेची अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन शासनस्तरावर आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहेत. अशाच पद्धतीने विजेची समस्या सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी लिंकलाईन, नवीन वीज उपकेंद्र तसेच सोलर प्रकल्प अशी विविध कामे मतदारसंघात रोहित पवार यांनी आणली आहेत त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here