जामखेड शहरातील शिक्षक काँलनी येथे भरदिवसा घरफोडी, सोन्याचा ऐवज लंपास

0
351

जामखेड न्युज——

जामखेड शहरातील शिक्षक काँलनी येथे भरदिवसा घरफोडी, सोन्याचा ऐवज लंपास


जामखेड येथील माजी सैनिक बजरंग तुळशीराम डोके (वय ५८) यांच्या घरातील बेडरुमधील लोंखडी कपाटात ठेवलेले ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची प्रकार घडला आहे. ही घटना दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ : ०५ ते : ४५ वाजेच्या दरम्यान जामखेड शहरातील शिक्षक काँलनी या ठिकाणी अगदीच दिवसा ढवळ्या घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड येथील माजी सैनिक बजरंग तुळशीराम डोके यांच्या राहते घराचा उघडे दरवाजाचा फायदा घेउन फिर्यादीचे उघडे घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन घरातील बेडरुमधील लोंखडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने फिर्यादीचे संमतीशिवाय स्वताचे आर्थीक फायद्याकरीता चोरुन नेले आहे. या नुसार फिर्यादी माजी सैनिक बजरंग तुळशीराम डोके यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याच्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संजय लोंखडे हे करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here