जामखेड न्युज——
जैन श्रावक संघाची कार्यकारीणी बदलण्यासाठी उपोषण सुरु
समाजबांधवांशी चर्चा करून कार्यकारीणी बदलू – कांतीलाल कोठारी
गेल्या २५ वर्षापासून जामखेड येथिल जैन श्रावक संघाची असलेली एकहाती कार्यकारणी ही खुप जुनी व मनमानी पद्धतीची झाली आहे. त्यामुळे या कार्यकारिणीत नविन युवकांना संधी मिळावी. हि मनमाणी पद्धतीने केलेली कार्यकारणी बरखास्त करून लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यावी व नवीन तरुणांना धर्माची सेवा करण्याची संधी द्यावी या मागणीसाठी जामखेड शहरातील काही युवक जैन स्थानक या ठिकाणी आज दि १२ रोजी सकाळपासून अमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला तरुण वर्गांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जैन श्रावक संघाची २५ वर्षापासून एकहाती व मनमानी पद्धतीची कार्यकारणी आहे. या ठीकाणी नवीन कार्यकारणी न करता मनमानी कारभार करण्यात येत असून याच्या निषेधार्थ शहरातील शरद शिंगवी, महावीर बाफना, निलेश (पींटु) बोरा, मंगेश बेदमुथ्था यांनी बंड केला असून आज दि १२ रोजी जैन स्थानक येथे सकाळपासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी तहसीलदार यांना देण्यात आले होते.
या वेळी उपोषणकर्ते शरद शिंगवी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की गेल्या २५ वर्षीपासून जामखेड जैन श्रावक संघाची कार्यकारणी जूनीच कार्यरत आहे. नियमाप्रमाणे दर तीन किंवा पाच वर्षांने कार्यकारणी बदलने आवश्यक असते. जेणे करुन समाजातील सर्वांना धर्माची सेवा करण्याचा लाभ मिळतो. नवीन युवकांनी अनेक वेळा कार्यरत कार्यकारणीला अनेक वेळा सांगूनसुद्धा नवीन कार्यकारणी तयार केली नाही व नवीन युवकांना सेवेचा लाभ होऊ दिला नाही.
त्यामुळे या कार्यकारणीचा मी २०१८ साली राजीनामा दिला. होतकरू युककांना संधी मिळाली पाहिजे आसे आमचे मत असुन या तरुणांकडे तन आणि मन आहे.मात्र धन नसले तरी संधी द्यायची नाही का? कार्यकारणी ही संपुर्ण समाज निवडणूकीच्या माध्यमातून करत आसते. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला शांततेच्या मार्गाने उपोषणास बसावे लागले आहे. आम्हाला एका महीन्यात निवडणुक लावु आसे अश्वासन द्या त्या नंतरच उपोषण मागे घेऊ असा इशारा शरद शिंगवी यांनी उपोषणा दरम्यान दिला आहे. सदरील उपोषणामध्ये आमच्या जीवाला काही धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आत्ताचे कार्यरत समाजाची कार्यकारणी राहतील. असा इशारा ही दिला आहे.
या वेळी प्रसिद्ध व्यापारी आकाश बाफना यांनी पाठिंबा देता वेळी सांगितले की या जैन संघाच्या कार्यकारणीत खुप वर्षापासून युवकांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना समाज्यातुन संधी देण्यात यावी. आम्ही आज संयमाच्या मार्गाने चालत आहोत. उपोषणाला बसण्याचा या तरुणांचा उद्देश कोणाला विरोध नसुन लोकशाही पद्धतीने म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या संविधाना प्रमाणे निवडणूक झाली पाहिजे. त्यामुळे कायदेशीर रीत्या समाज्याची निवडणूक घ्यावी आसे अवहान करु आकाश बाफना यांनी या उपोषणास पाठींबा दिला.
याच बरोबर आज अभय शिंगवी, सचिन फिरोदीया, तेजस बोरा, योगेश भंडारी, गणेश भळगट, अभय बोरा, बाळुशेठ पारख, सुशिल बेदमुथ्था, विजु बोगावत, संदीप भंडारी, सचिन भंडारी, प्रविण बाफना, दिलीप नहार, अभय बाफना, अशोक बाफना, शुभम बोरा, मुन्ना लुंकड, गैतम बाफना, मनिष जैन, नंदुशेठ बोरा, कांतीलाल बोथरा, या सर्वांनी उपोषणस्थळी भेट दिली आहे.
चौकट
सर्व समाजबांधवांना विश्वासात घेऊन कार्यकारीणी बदलण्यात आम्ही तयार आहोत यासाठी सर्व समाजबांधवांशी चर्चा करून त्यांच्या विचाराने नवीन कार्यकारीणी करू
कांतीलाल कोठारी अध्यक्ष जैन श्रावक संघ जामखेड