जामखेड न्युज——
स्पर्धा परिक्षेसाठी नियोजन महत्त्वाचे – पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नागरगोजे
स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये त्यांचा सत्कार

स्पर्धा परीक्षा करत असताना आपण प्रत्येक प्रत्येक टप्प्यावर अत्यंत काळजीपूर्वक राहिले पाहिजे.कोणत्याही क्षणी आपण स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. स्पर्धा परीक्षा करत असताना संयम महत्त्वाचा असून योग्य नियोजन असणे आवश्यक आहे.असे मुंबई पोलीस दलातून खात्याअंतर्गत परीक्षेमार्फत पोलीस उपनिरीक्षक झालेल्या जामखेड तालुक्यातील मोहा गावचे चे सुपुत्र सोमनाथ नागरगोजे यांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी अधिकारी अशोक गीते, श्री मयूर भोसले सर,लटपटे सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सोमनाथ शिंदे यांनी सर केले व उपस्थित सर्वांचे आभार शिंदे बी एस सर यांनी मानले.


