जामखेड न्युज——
जामखेड कर्जत मतदार संघातील दोन्ही आमदारा कडून दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचे राजकीय स्वप्नांचा धुरळा….ॲड.डॉ.अरुण (आबा)जाधव
जामखेड व कर्जत मतदार संघातील सर्व जनतेस आव्हान करण्यात येते की जामखेड कर्जत मतदार संघातील शासकीय विविध विभागातील मंजूर कामे व नळ पाणी पुरवठा योजना या संदर्भात मा.मंत्री प्रा.राम शिंदे साहेब व आमदार रोहित दादा पवार या दोघांमध्ये श्रेय वादाचा वाद वाढत चाललेला आहे.
त्याचा परिणाम गाव पातळीवरील काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर व जनतेवर होत आहे.या मतदार संघामध्ये गेली 35 वर्षापासून कोणत्या कोणत्या पक्षाने सत्ता भोगली कोणत्या पक्षाचे आमदार व खासदार होते. हे जामखेड मतदार संघातील सर्व जनतेला माहित आहे.
कामातून लोकांच्या समोर यावे मतदार संघातील जनता दोन्ही आमदाराला जवळून ओळखून आहे.या मतदार संघातील वंचित समूहातील सामाजिक राजकीय परिस्थिती काय आहे ही जनता ओळखून आहे.दोन्ही आमदाराचा प्रचंड मोठा दबाव कार्यकर्ते व जनतेवर आहे.
दोन्ही आमदाराने केलेल्या कामाचा हिशोब जामखेड व कर्जत मतदार संघातील जनता एकत्र करून मेळावा घेऊन जनतेच्या दरबारात मांडावा मग जनता जाहीरपणे सांगेन कोणी काम केले.आणि कोणी नाही केले.जनता न्याय देवता ठरवेल जामखेड व कर्जत मतदार संघातील वंचित समुहातील कार्यकर्ते व जनतेला माझे आव्हान आहे.की या दोघांच्या नादी लागून वंचित समूहातील कार्यकर्ते सत्तेमध्ये जाण्यापासून रोखत आहे.पुढील काळातील नगरपरिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती वंचितसूमहातील कार्यकर्त्याने डोळ्यापुढे ठेवून कामाला लागावे या दोन्ही आमदाराकडून दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांने सत्तेची अपेक्षा बाळगू नये असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ.अरुण (आबा) जाधव यांनी केले.