जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांनी आयोजित केलेल्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराला परदेशी डॉक्टरांबरोबरच जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ.मॉर्को देखील होते उपस्थित
आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराला परदेशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी लावली हजेरी आणि केली रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
अपघातात हात गमावलेल्या व्यक्तीला एका मृत व्यक्तीचा हात बसवून जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ.मॉर्को देखील होते उपस्थित
कर्जत- जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून तसेच कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यामध्ये कॅनडा, स्विझरलँड, अमेरिका यासारख्या परदेशातील 7 तज्ञ डॉक्टरांच्या तर इतर 33 डॉक्टरांच्या अशा एकूण 40 माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आल्या, यामध्ये शेकडो रुग्णांवरती उपचार करण्यात आले. या शिबिरामध्ये हात- पायाच्या सर्व प्रकारच्या विकृती, चिकटलेली बोटे तसेच वाकडे असलेले पाय यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. संबंधित शिबीर जामखेडमधील आरोळे हॉस्पिटलमध्ये पार पडले. विशेष म्हणजे अशा प्रकारचे शिबिर झाल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार नागरिकांना आपल्या तालुक्यातच उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. परदेशातून आलेल्या डॉक्टरांशी
या शिबिराला डॉ.मार्को लॅन्झेटा ज्यांनी अपघातामध्ये हात गमावलेला एका व्यक्तीला मृत व्यक्तीचा हात बसवून जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली त्यांची विशेष उपस्थिती होती. सध्या ज्या व्यक्तीला हात बसवण्यात आला आहे तो देखील सामान्य व्यक्तींप्रमाणेच आपल्या हाताची हालचाल करू शकत आहे हे विशेष* यासोबतच डॉ.फॅबियो वासेना, डॉ.स्टेफानो पाओलिनी, डॉ.जेम्मा बिफोली, डॉ.मारिया नकामबुगवे, डॉ.मेरी ज्युलिएट नम्पावू, डॉ.व्हॅलेंटिना कॉर्नी या विदेशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील कर्जत-जामखेड मतदारसंघात येऊन येथील रुग्णांवरती उपचार केले.
अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करायच्या झाल्यास त्यावर 3 ते 5 लाखांपर्यंत साधारणतः खर्च येतो. तसेच काही रुग्णांना 8 लाखांपर्यंतही खर्च येऊ शकतो. परंतु या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया या मोफत करण्यात आल्या असून एवढेच नाही तर रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यापासून घरी सुटी मिळेपर्यंत रुग्ण व नातेवाईक यांच्या जेवणाची राहण्याची संपूर्ण सोय देखील मोफत करण्यात आली हे विशेष. या शिबीरादरम्यान तब्बल 50 यशस्वी शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांवर करण्यात आल्या.
चौकट
जगप्रसिद्ध सर्जन डॉ. मॉर्को यांनी एका मृत व्यक्तीचा हात अपघातग्रस्त व्यक्तीला बसवून जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली होती. ते देखील जामखेडमध्ये आयोजित शिबिराला उपस्थित राहिल्याने तज्ज्ञांकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना घेता आले आणि लाखोंचा खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत पार पडल्या.