जामखेड न्युज——
व्यापारी हल्ला प्रकरण
जामखेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड येथील अंदुरे कुटूंबावरील हल्ला प्रकरणी आज पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे व्यापारी रमेश (दादा) आजबे व सागर अंदुरे यांनी शहरातील सर्व व्यापाऱ्यांचे आभार मानले तसेच या मधिल आरोपींना एक दिवस जामखेड बंद ठेऊन ही पोलिंसाकडुन अटक झाली नाही तर नगर येथील पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा बोलताना व्यापारी सागर आंदुरे व त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
एक महीन्यापुर्वी शहरातील व्यापारी अंदुरे कुटूंबीयांवर हल्ला करुन फरार आसलेले आरोपी अद्यापही फरार आहेत त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत दि ६ रोजी तहसीलदार यांना व्यापाऱ्यांच्या वतीने जामखेड बंद बाबत निवेदन देखील देण्यात आले होते. याच अनुशंगाने आज दि ७ रोजी जामखेड शहरात व्यापाऱ्यांनकडुन पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळ पासूनच शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.
जामखेड बंद मध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने या व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करताना व्यापारी रमेश (दादा) आजबे बोलताना म्हणाले की जामखेड येथिल व्यापाऱ्यांनी काल तहसीलदार यांना बंद बाबत निवेदन दिले व आपली दुकाने बंद ठेऊन आजच्या जामखेड बंदला पाठींबा दिला. शहरातील व्यापाऱ्यांना ब्लॉकमेल केले जात आहे. पैशाची मागणी केली जात आहे. आज जामखेड बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी अंदुरे कुटूंबाला न्याय देण्याचे काम केले आहे. कारण जामखेड ची बाजारपेठ मोठी आहे आणि ती टीकली पाहिजे आसे म्हणत आजबे यांनी व्यापाऱ्यांचे अभार मानले.
व्यापारी सागर आंदुरे यांनी व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की शहरात बंद साठी कुणावर दबाव अथवा रॅली काढली नाही फक्त बंदचे अवहान केले होते आणि व्यापाऱ्यांनकडुन देखील आपली दुकाने बंद ठेऊन आम्हाला पाठिंबा दिला त्या बद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच मारहाण करणार्या आरोपींना एक दिवस जामखेड बंद ठेऊन ही पोलिंसानकडुन अटक झाली नाही तर काही दिवसात नगर येथील पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही पत्रकारांशी बोलताना व्यापारी सागर आंदुरे व त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. यानंतर दुपारपासून काही व्यापाऱ्यांनी हळुहळु आपली दुकाने उघडण्यास सुरवात केली सायंकाळ पर्यंत संपूर्ण बाजारपेठ पुर्व पदावर आली.