जामखेड न्युज——
अंदुरे हल्ला प्रकरण वातावरण तापले
व्यापारी असोसिएशनच्या वतीने उद्या जामखेड बंद
शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी आसलेल्या अंदुरे कुटूंबावर हल्ला करणारे आरोपी गेल्या एक महिन्यांपासून फरार आहेत. त्यामुळे या आरोपींना तातडीने अटक करावी यासाठी उद्या जामखेड व्यापारी असोसिएशनच्या वतीने वतीने बाजारपेठ बंद ठेऊन जामखेड शहर बंद ठेवण्याचा निर्णय तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात घेतला आहे.
गेल्या एक महिन्यापुर्वी जामखेड शहरातील अंदुरे कुटूंबावर हल्ला केल्या प्रकरणी आरोपींवर खंडणी व खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र हे आरोपी अद्याप अटक झालेले नसुन ते ठिकठिकाणी विवाह सोहळ्याला उपस्थित असतात तसेच याच आरोपींचे बोर्ड खुलेआम शहरात विनापरवाना लागले आहेत. त्यामुळे शहरात व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे एवढ्या खुलेआम पध्दतीने कसे फिरतात व पोलीस प्रशासनाकडून कारवाई का होत नाही. सदर आरोपी खुलेआम एवढी दहशत निर्माण करुन समाज्यामध्ये कोणता संदेश देऊ इच्छित आहेत. एवढे गुन्हे दाखल होऊनही आमच्यावर कुठलीच कारवाई होत नाही व आमचे कोणी काही करु शकत नाहीत असा संदेश समाज्यात पसरत आहे.
अनेक वेळा गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी करुनही आरोपींना अटक होत नाही. यामागे कोणाचा हात आहे का असा प्रश्न व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापाऱ्यांना केलेल्या अव्हानात म्हंटले आहे की आज अंदुरे कुटूंबावर हल्ला झाला आहे तीच वेळ इतर व्यापाऱ्यांवर देखील येऊ शकते त्यामुळे उद्या बुधवार दि ७ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या जामखेड बंद मध्ये सहभागी होऊन जामखेड शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या बाबत आज दि ६ डिसेंबर रोजी जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना उद्याच्या जामखेड बंद बाबत जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर जामखेड चे माजी सरपंच व व्यापारी सुनिल कोठारी, प्रा मधुकर (आबा) राळेभात, सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी रमेश (दादा) आजबे, सागर गुंदेचा, अजयशेठ कोठारी, संकेत ढाळे, अनंत चिंतामणी, मनोज कुलथे, निलेश तवटे, उमेश नगरे, सागर अंदुरे, शशिकांत अंदुरे, उमेश अंदुरे, सागर आष्टेकर, सागर गिरमे सह अनेक व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.