जामखेड न्युज ——
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्यपदी विनायक विठ्ठलराव राऊत यांची निवड.
जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते गोरोबा चित्र मंदिरचे मालक तथा कै. विठ्ठल आण्णा राऊत यांचे चिरंजीव विनायक राऊत यांची रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्यपदी विनायक विठ्ठलराव राऊत यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल बैठकीत ठरावानुसार श्री नागेश विद्यालयाच्या स्कूल कमिटी सदस्यपदी सन २०२२-ते २०२५ या कालावधी साठी विनायक राऊत यांचे निवड झाली.
कै. विठ्ठलराव (आण्णा) राऊत हे नागेश विद्यालयाचे स्कूल कमिटीचे ३६ वर्ष सदस्य होते कै.आण्णा नेहमीच सामाजिक, राजकीय, धार्मिक ,आर्थिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर होते त्यांच्या कार्याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने देखील त्यांचे जेष्ठ सुपुत्र विनायक यांची स्थानिक स्कूल कमिटी सदस्य पदी निवड केली.
त्यांचे निवडीचे पत्र रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर नागेश विद्यालयाचे प्राचार्य मडके बी. के यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केले त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या प्रसंगी प्रा.मधुकर आबा राळेभात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला
उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तुकाराम कन्हेरकर, नागेश विद्यालय स्कूल कमिटी जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, रा काँ. सरचिटणीस व नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य राजेंद्रजी कोठारी, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित( दादा) पवार यांनीही अभिनंदन केले यावेळी सर्वश्री सुरेशभाऊ भोसले, प्रकाश सदाफुले, कन्या विद्यालयच्या मुख्याध्यापक चौधरी मॅडम, विश्वदर्शनचे गुलाबशेठ जांबळे, प्रहार संघेटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, संदीप भालेराव, कुंडल राळेभात, रमेश बोलभट, संतोष सरसमकर, मयूर भोसले यांच्या सह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
संस्थेच्या पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी , वै.विठ्ठलअण्णांचे कार्य पूर्ण करण्यासाठी व विद्यार्थी हितासाठी आम्ही कार्य करू असे मनोगत विनायक राऊत त्यांनी व्यक्त केले.